फोटो सौजन्य- pinterest
आज रविवारी चंद्र वृषभ राशीत संक्रमण करत असल्याने संपूर्ण दिवस सूर्याचे वर्चस्व राहणार आहे. तर चंद्र सर्वोच्च स्थानावर असल्याने आज गौरी योग तयार होईल. चंद्रापासून मंगळ ग्रह मध्यस्थानी असल्याने धन योग तयार होईल. शुक्र आणि चंद्राच्या युतीमुळे कलानिधी योग तयार होईल. तसेच शुक्र ग्रह आज मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करत आहे. सूर्य देव आणि धन योगामुळे मेष राशीसह या राशीच्या लोकांना आजचा दिवस फायदेशीर आहे. या लोकांना आज नशिबाची साथ लाभेल. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस चांगला राहील. आज सूर्यदेवाच्या कृपेने पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळतील. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. व्यवसाय करणारे लोक कामानिमित्त परदेशात जाऊ शकतात. तुम्हाला आयात आणि निर्यात संबंधित कामांचा फायदा होईल. या लोकांना धार्मिक कार्यामध्ये रस राहील. तुम्ही आज दानधर्म करु शकता.
वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस अपेक्षेपेक्षा जास्त चांगला असणार आहे. तुमची नियोजित कामे आज वेळेवर पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची नवीन व्यक्तीची ओळख होईल त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील.
कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. तुम्हाला भावंडांकडून पाठिंबा मिळेल. तुमची प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या सुखसोयींवर खर्च करू शकता. सोशल मीडियावरील तुमचा प्रभाव वाढेल. कुटुंबासोबत तुम्ही आज वेळ घालवू शकता.
वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस भाग्यशाली राहणार आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना इच्छित नोकरी मिळू शकते. ज्या लोकांना बदली हवी असेल त्यांना ती मिळू शकते. तुमच्या व्यवसायात वाढ होईल. कुटुंबातील वातावरण अनुकूल राहील. जर तुमच्या नात्यांमध्ये मतभेद असतील तर ते दूर होतील.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस खास राहणार आहे. तुम्हाला आज चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. एखाद्या योजनेत तुम्ही गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. चित्रपट, मनोरंजन, नृत्य, गायन, डिझायनिंग इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)