फोटो सौजन्य- istock
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा ऑगस्ट महिना खूप खास राहणार आहे. पवित्र श्रावण महिन्यापासून ते रक्षाबंधनासारख्या पारंपरिक सणांपर्यंत सर्व सण या महिन्यात येत आहे. यावेळी सूर्य, बुध आणि शुक्र या ग्रहांच्या राशी संक्रमणाचा सर्व 12 राशीच्या लोकांवर परिणाम होईल. सूर्य कर्क आणि सिंह राशीत असल्यास या राशीच्या लोकांच्या जीवनात नवीन आत्मविश्वास निर्माण होईल. शुक्र, मिथुन आणि कर्क राशीत राहून प्रेम, नातेसंबंध आणि आर्थिक स्थितीमध्ये बदल होऊ शकतो.
मंगळ कन्या राशीमध्ये असल्यामुळे या लोकांना कामाच्या ठिकाणी कठोर मेहनत घ्यावी लागेल त्याचा तुम्हाला लाभ होईल. मीन राशीमध्ये शनि प्रतिगामी असल्यामुळे संयम आणि समजूतदारपणाची आवश्यकता वाढेल. राहू आणि केतू सिंह राशीत असल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात अनपेक्षित बदल होताना दिसून येतील. ज्यामुळे संवाद आणि विचारांमध्ये काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. या महिन्यात बदलत्या ग्रहांच्या स्थितीमुळे काही राशीच्या लोकांना नवीन संधी मिळतील. ऑगस्ट महिन्यात कोणत्या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्यात बुध ग्रहाची हालचाल महत्त्वाची आहे. महिन्याच्या सुरुवातीला बुध कर्क राशीत असेल तो त्याची स्थिती 11 ऑगस्ट रोजी कर्क राशीमध्ये उद्यास येईल. 30 ऑगस्ट रोजी बुध सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी बुध पुष्य, आश्लेषा आणि माघ नक्षत्रांमध्ये असल्याने त्याचा अधिक प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर होईल. शुक्र ग्रह ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मिथुन राशीत असल्याने गजलक्ष्मी राजयोग तयार होईल. 21 ऑगस्ट रोजी कर्क राशीत असल्यास बुधाची युती होऊन लक्ष्मी नारायण योग तयार होईल. शुक्र ग्रह आर्द्रा, पुनर्वसु आणि पुष्य नक्षत्रांमध्ये स्थित असेल तर सूर्य देखील कर्क राशीत असेल त्यामुळे 17 ऑगस्ट रोजी सूर्य स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करेल त्यामुळे ग्रहण योग तयार होईल.
मेष राशीमध्ये शनिच्या साढेसातीचा सुरु असताना त्याची वक्री नकारात्मक प्रभाव कमी करेल. ज्यामुळे व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतील. त्याचप्रमाणे व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक फायदा होईल. तसेच तुम्ही गुंतवणूक देखील करु शकतात. त्याचसोबत तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी देखील करु शकतात.
सूर्य स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करणार असल्याने या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील. या लोकांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये भरपूर फायदे होतील. नेतृत्व कौशल्ये सुधारु शकतात त्यामुळे तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ चांगला राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील.
शुक्र ग्रह मिथुन आणि कर्क राशीत राहिल्याने गजलक्ष्मी आणि लक्ष्मी नारायण योग तयार होईल याचा फायदा तूळ राशीच्या लोकांना होईल. ज्यामुळे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. सौंदर्य, कला, प्रेम आणि विवाहात शुभता राहील. वैवाहिक जीवनातील समस्या कमी होतील. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवावे.
धनु राशीमध्ये गुरु आपल्या शुभ स्थितीत असल्याने शुक्रासह गजल राजयोग तयार होईल त्यामुळे या राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम नोकरी, शिक्षण आणि विवाहाशी संबंधित बाबींमध्ये दिसून येईल. नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. व्यवसायामध्ये असणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
मकर राशीच्या लोकांना या काळाचा शुभ परिणाम होणार आहे. या काळामध्ये तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. जुने आजार बरे होतील आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी मिळतील. आरोग्य आणि करिअर दोन्हीसाठी फायदेशीर ठरेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)