
ज्योतिषशास्त्रात कुंडलीला महत्व जास्त आहे. कुंडलीच्या आधारे मानवी जीवनाच्या चांगल्या वाईट घटनांचा अंदाज लावता येतो. -ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थानाला महत्व दिलं जातं. ग्रहांच्या स्थितीवरुन एखाद्या व्यक्तीच्या भविष्यात काय असू शकतं याचा अंदाज बांधला जातो. ज्योतिषशास्त्र हे हिंदू धर्मातील पुरातन शास्त्र आहे, त्यामुळे याला जास्त महत्व दिलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीची काही ना काही खासियत आहे. कोणी बोलण्यात पटाईत असतं तर कोणी कलेमध्ये प्राविण्य मिळवतं. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की, बारा राशीच्या बारा तऱ्हा आहेत, याच राशींच्या मुलांबाबात आज जाणून घेऊयात.ज्योतिषशास्त्रानुसार अशी काही मुलं आहेत ज्यांचा राजयोग हा लग्नानंतर सुरु होतो. या मुलांना त्यांच्या सासरकडून धन, संपत्ती किंवा वारसा स्वरूपात लाभ मिळतो, कारण त्यांच्या पत्रिकेत धनभाव (२रा भाव), सप्तम भाव (पत्नि/पती भाव) आणि अष्टम भाव (सासरचा लाभ) हे शुभ ग्रहांनी प्रभावित असतात. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊयात.
वृषभ
वृषभेचा अधिपती शुक्र असल्याने ही मंडळी प्रेमळ स्वभावाची असतात. शुक्र कलासक्त ग्रह असण्याबरोबरच भौतिक सुखाचा देखील कारक आहे.
शुक्र या धनदात्या ग्रहाची ही रास आहे. वृषभ राशीचे मुलं सौंदर्यप्रेमी, स्थिर आणि कुटुंबप्रिय असतात. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांना विवाहानंतर सासरकडून आर्थिक मदत, घर, दागिने किंवा व्यवसायात भागीदारी मिळू शकते.
कर्क
चंद्र या संवेदनशील ग्रहाची ही रास म्हणजे कर्क. कर्कची मुलं हळवी पण कणखर असतात सासरच्या मंडळींचा आपल्या जावयावर विश्वास असतो. कर्क राशीचे मुलं सासरकडील व्यक्तींना आपल्याकडे आकर्षित करतात. त्यांना घर-जमीन, मालमत्ता किंवा भावनिक तसेच आर्थिक आधार सासरकडून मिळतो.
तुळ
शुक्राची आणखी एक रास म्हणजे तुळ. या राशीची मुलं सामाजिक, आकर्षक आणि संबंध जपणारे असतात. सर्वांना धरुन असताता. नात्यांचं महत्व ही माणसं जास्त जपतात. त्यामुळे सासरकडून सन्मान आणि आर्थिक सहाय्य मिळते.
मकर
शनीची रास असल्याने मकर राशीचे मुलं मेहनती पण धैर्यवान असतात. विवाहानंतर भाग्य खुलतं. सासरकडून व्यवसाय, प्रॉपर्टी किंवा वारसाहक्काचा लाभ मिळू शकतो.
मीन
गुरू या शुभ ग्रहाची रास. मीन राशीचे मुलं धार्मिक, दयाळू आणि भाग्यवान असतात. त्यांना सासरकडून प्रेम, आर्थिक स्थैर्य आणि वारसाहक्क मिळतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)