फोटो सौजन्य- pinterest
सध्याच्या काळामध्ये सोने खरेदी करणे परवडण्यासारखे नाहीये. पण तुम्ही मुलांना चांदीची चेन घालू शकता. ती घालणे देखील चांगले मानले जाते. कारण चांदीचा संबंध चंद्राशी असल्याचे मानले जाते. यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगला मानला जातो. मुलांना चांदीची चेन घालण्याचे काय आहेत फायदे, जाणून घ्या
असे मानले जाते की, चांदीचा संबंध चंद्राशी आहे. चंद्र हा मन, भावना आणि शांतीचे प्रतिनिधित्व करतो असे मानले जाते. हिंदू धर्मात त्याला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे लहान मुलांना चांदीची चेन घालणे खूप फायदेशीर मानले जाते. मान्यतेनुसार, चांदीमुळे मन शांत राहते. तसेच मुलांच्या विकासासाठी चांदीचा वापर करणे फायदेशीर ठरते. चंद्राला मानसिक स्थिती, सौंदर्य, शीतलता आणि शांतीचा कारक मानला जातो. अशा वेळी मुलांना चांदीची चेन घातल्याने मुलांच्या जीवनावर सकारात्मक आणि या सर्व घटनांचा परिणाम होताना दिसून येतो.
ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, इतर ग्रहापेक्षा जास्त प्रभाव चंद्राचा 14 वर्षांच्या वयापर्यंत असणाऱ्या मुलांवर जास्त असतो. 14 वर्षांपर्यंतच्या मुलांची कुंडली ही अशुभ मानली जाते. कारण त्यांच्या जीवनामध्ये एकाच ग्रहाचा प्रभाव असल्याने त्यांचा संबंध चांदीशी संबंधित असल्याचे मानले जाते. या कारणांमुळे 14 वर्षांपर्यंतच्या मुलांना सोन्याच्याऐवजी चांदीची चेन घालणे चांगले आणि सर्वोत्तम मानले जाते. मुलांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतात.
चांदी ही चंद्राचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये चंद्राची असलेली अशुभ स्थिती मजबूत होण्यास मदत होते. तसेच 14 वर्षांपर्यंतच्या मुलांना चांदीची चेन घातल्याने त्यांच्या जीवनात येणाऱ्या नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. त्यामुळे त्यांचे आरोग्यही चांगले राहते. मूलांच्या गळ्यामध्ये चांदीची चेन घालून ठेवल्यास त्यांच्यामधल्या मानसिक विकासात वाढ होते आणि त्याची एकाग्रता देखील वाढण्यास मदत होते. यामुळे 14 वर्षांपर्यंतच्या मुलांना चांदीची चेन घालायला पाहिजे.
मुलाला अस्वस्थ वाटेल किंवा त्रास होऊ नये म्हणून चेन जास्त जड नसावी
चेनची रचना अशी ठेवा की लहान मुलांच्या त्वचेला ती कधीही टोचणार नाही
मुलांच्या गळ्यात दिवसभर चेन ठेवणे गरजेचे नाही
जर मुलांना वारंवार सर्व गोष्टी तोंडात घालायची सवय असल्यास काही दिवस चेन घालू नये.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)