फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांच्या होणाऱ्या सततच्या हालचालींमुळे व्यक्तीच्या जीवनावर शुभ अशुभ प्रभाव पडताना दिसून येतात. जुलै महिन्यामध्ये वरुण वक्री होणार आहे त्यामुळे या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे.
ज्योतिषशास्त्रामध्ये 9 ग्रहांचे वर्णन करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये नेपच्युन ग्रहांचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये नेपच्युन ग्रहाला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. या ग्रहाचा संबंध कल्पनाशक्ती, भ्रम आणि गूढतेशी असल्याचे मानले जाते. नेपच्युन ग्रहामुळे लोकांना जीवनात काहीतरी मोठे करण्याची प्रेरणा मिळते आणि ते साध्य करण्यासाठी नेपच्युन देखील महत्त्वाची भूमिका बजावतो.
ज्या लोकांवर नेपच्युनचा वाईट प्रभाव असतो त्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच अशा लोकांना शरीरासाठी हानिकारक असलेल्या गोष्टींची सवय लागते. 5 जुलै रोजी नेपच्युन कधी वक्री होणार आणि त्याचा शुभ परिणाम कोणत्या राशीच्या लोकांवर होणार जाणून घ्या.
पंचांगानुसार, आषाढ महिन्यामधील शुक्ल पक्षातील दशमी तिथी आज म्हणजेच शनिवार, 5 जुलै रोजी वरुणाने वक्री गतीला हालचाल करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. या अवस्थेमध्ये तो 159 दिवस राहील. शनिवारी सकाळी 2.58 वाजता त्याने उलट दिशेने म्हणजे मागे सरकण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आता तो 10 डिसेंबरपर्यंत तो मागे सरकत राहील.
कर्क राशीच्या लोकांवर नेपच्यूनच्या वक्री गतीचा मानसिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होताना दिसून येईल. ज्या लोकांना आर्थिक अडचण भासत असेल त्यांच्या अडचणी दूर होतील. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बऱ्याच काळापासून प्रलंबित असल्यास ते पूर्ण होण्यास सुरुवात होईल. आरोग्यामध्ये सुधारणा होईल. धार्मिक ठिकाणी जाण्याची योजना आखू शकतात.
वृश्चिक राशीच्या लोकांवर नेपच्यूनच्या वक्री गतीमुळे कुटुंबामध्ये बिघडलेले वातावरण सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे घरातील वातावरणामध्ये सकारात्मकता जाणवेल. ज्या लोकांना करिअरची चिंता आहे अशा लोकांना एखाद्याचे मार्गदर्शनाने करिअरमध्ये यश मिळेल. वरिष्ठ लोकांच्या मदतीने तुमच्या अनेक समस्या दूर होतील. याशिवाय तुम्हाला संपत्तीचा लाभ होऊ शकतो. ज्यामुळे तुमच्यावर असलेले कर्ज तुम्ही फेडू शकता.
मीन राशीचा स्वामी नेपच्युन मानला जातो. ज्यामुळे हा काळ मीन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या राशीच्या तरुणांना खेळामध्ये रस वाढेल आणि त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. नात्यांमधील गोडवा वाढेल. तुम्ही जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करु शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)