फोटो सौजन्य- pinterest
ऑफिसमध्ये आपलं काम चांगल व्हाव, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून आपली प्रशंसा व्हावी, आपल्याला लवकरच बढती मिळावी यासाठी सर्वजण आहोरात्र मेहनत करत असतात. पण कधीकधी यश मिळत नाही. क्वचित या गोष्टीचे कारण ऑफिसच्या बॅगेत ठेवत असलेल्या वस्तू. बॅंगेत ठेवलेल्या काही गोष्टींचा परिणाम तुमच्या नशीब आणि ग्रहांवर होत असतो. या गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा पसरते. ऑफिसच्या बॅगेत या वस्तू ठेवल्यास करिअरच्या मार्गात अडथळा आणू शकतात. जाणून घेऊया ऑफिसच्या बॅगेत कोणत्या वस्तू ठेवणे टाळावे.
बऱ्याच महिला आपल्या बॅगेमध्ये लिपस्टिक, काजळ असे अनेक साहित्य ऑफिसच्या बॅगेत ठेवतात. ज्योतिषशास्त्रानुसार, या सर्वांचा संबंध शुक्र ग्रहांशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. कामाच्या ठिकाणी असलेले वातावरण बुध आणि मंगळ ग्रहांशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. अशा वेळी व्यवसाय करणाऱ्यांनी कोणतेही निर्णय घेताना त्याचे परिणाम काय होऊ शकतात यावर लक्ष द्यावे. या सर्वांमुळे तमचे मानसिक संतुलन बिघडू शकते.
जर तुम्ही एखाद्या वेळेस वापरलेले खराब कपडे ठेवणे ही सवय तुमच्या करिअरसाठी हानिकारक ठरु शकते. असे म्हटले जाते की, बॅगेमध्ये खराब कपडे ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा तयार होऊ शकते. यामुळे तुमच्या जीवनामध्ये थकवा, मानसिक शांतता आणि चिडचिड या गोष्टी होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे कामाच्या ठिकाणचे वातावरण देखील बिघडू शकते.
ऑफिसच्या बॅगेत नेल कटर आणि छोटे चाकू ठेवणे ही सामान्य गोष्ट आहे. पण याचा संबंध ज्योतिषशास्त्रात नातेसंबंधाशी येतो. विशेष करुन कामाच्या ठिकाणचे वातावरणाचा तुमच्या प्रतिमेवर आणि कामाच्या गतीवर परिणाम करू शकतात. त्यामुळे या वस्तू बॅगेत न ठेवणे फायदेशीर ठरते.
बऱ्याचदा परफ्यूम आणि डिओडोरंट्स हे अल्कोहोल असते जे नशेशी संबंधित मानले जाते. मान्यतेनुसार या गोष्टीमुळे आपले लक्ष विचलित होऊ शकतात आणि कामाच्या ठिकाणातील गांभीर्य कमी करु शकतात. या गोष्टी तुम्ही नेहमी ऑफिसला जाताना घेऊन जात असाल तर तुमच्या करिअरमध्ये येऊ शकतात.
ऑफिसच्या बॅगेमध्ये टूथब्रश, कंगवा किंवा इतर वैयक्तिक वस्तू ठेवणे हानिकारक मानले जाते. या गोष्टी बॅगेत ठेवल्यास त्यातून निघणारी ऊर्जेचा इतर गोष्टींवर परिणाम होतो. असे म्हटले जाते की, कामाच्या ठिकाणचे वातावरण बिघडते आणि काम करण्याची इच्छा राहत नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)