फोटो सौजन्य- pinterest
आज सोमवार 21 जुलै रोजी चंद्र दिवसरात्र वृषभ राशीत असेल. सोमवारचा स्वामी ग्रह चंद्र वृषभ राशीत असल्याने गौरी योग तयार होईल. त्यासोबत रोहिणी नक्षत्रात सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. तसेच आज एकादशीसुद्धा आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला जास्त महत्व आहे. सोमवारचा दिवस तुळ राशीसह या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर राहील.
वृषभ राशींच्या लोकांसाठी आजचा सोमवारचा दिवस फायदेशीर राहील. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही एखादी नवीन योजना आखू शकता त्यात तुम्हाला यश मिळेल. नवीन योजनांवर तुम्ही काम करु शकता.
मिथुन राशींच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. करियर मध्ये नवीन संधी उपलब्ध होती. तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकेल. एखाद्या जुन्या ओळखीमुळे आर्थिक लाभ होऊ शकेल. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. तुमची कोणतीही इच्छा आज पूर्ण होऊ शकेल.
सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस शुभ राहील. तुम्ही विचारपूर्वक केलेले काम आज पूर्ण होईल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना यश मिळेल. प्रलंबित करण्यास पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
तूळ राशींच्या लोकांचा आजचा दिवस खूप खास असणार आहे. व्यवसाय तुमची प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या आवडीचे काम करण्याची संधी मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न कराल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला तुमची अडकलेले पैसे परत मिळतील. रिअल इस्टेट आणि वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना यश मिळेल. मानसिक शांती मिळेल. रोजगाराच्या शोधात असलेल्यांना अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. तसेच तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)