फोटो सौजन्य- istock
नवीन आठवड्याची सुरुवात आज ( 21–27 जुलै) पासून होत आहे. ग्रहांच्या संक्रमणाचा आणि नक्षत्र बदलाच्या संक्रमणाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर विविध प्रकारे होऊ शकतो. या लोकांना विविध संधी आणि आव्हाने मिळू शकतात. ग्रहांच्या बदलांमध्ये 16 जुलै रोजी सूर्याने कर्क राशीत प्रवेश केला आहे तर 19 जुलै रोजी बुध सिंह राशीत प्रवेश केला आहे तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मंगळ ग्रहाने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. यावेळी श्रावण महिना देखील सुरु होत आहे. या बदलांच्या परिणामामुळे काही राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर काहींना पदोन्नतीच्या संधी मिळू शकतील. 21 ते 27 जुलैचा हा आठवडा तूळ ते मीन राशीच्या लोकांसाठी विशेष राहील. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याचा चौथा आठवडा कसा राहील, जाणून घ्या
मेष महिन्याचा हा आठवडा चढ उताराचा राहील. या आठवड्यात आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवू नये. यावेळी जमीन आणि इमारतीशी संबंधित कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतात. या आठवड्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडू शकते. तसेच व्यावसायिकांना व्यवसायामध्ये चढ उतार जाणवू शकतात. नातेसंबंधात असलेले मतभेद दूर होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस निर्माण होईल.
वृषभ राशीच्या लोकांचा हा आठवडा मेहनतीचा राहील. या लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामामध्ये अपेक्षित बदल होऊ शकतात. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अनावश्यक खर्च करणे टाळा. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. रागावर नियंत्रण ठेवा.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. या आठवड्यात करिअर आणि व्यवसायात तुम्हाला नफा होऊ शकतो. मात्र हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या कठीण असू शकतो. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना लांबचा प्रवास करावा लागू शकतो. जर तुम्ही एखाद्या योजनेत पैसे गुंतवले असाल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक राहील. या आठवड्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर राहणार आहे. या आठवड्यात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. तु्म्हाला व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो. मालमत्तेशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार यश मिळेल. विद्यार्थ्यांचा अभ्यासात रस वाढेल.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चढ उताराचा राहू शकतो. वैयक्तिक कामाच्या निमित्ताने लांबचा प्रवास करावा लागू शकतो. प्रवासादरम्यान प्रभावशाली लोकांशी संपर्क निर्माण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना बदली हवी असल्यास ती मिळू शकते. कोणतेही आर्थिक व्यवहार करताना घाईमध्ये निर्णय घेऊ नका.
तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडडा शुभ राहणार आहे. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती असेल. तुमची इच्छित पदोन्नतीची इच्छा पूर्ण होऊ शकते. करिअर आणि व्यवसाय करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही जी मेहनत घ्याल त्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चढ उताराचा राहणार आहे. तुम्ही तुमचा वेळ आणि नातेसंबंधांचा सुज्ञपणे वापर करावा, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. आर्थिक लाभ होऊ शकतात. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभाग होऊ शकतात.
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा धावपळीचा राहील. कामामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेले राहाल. तुम्हाला शारीरिक समस्या उद्भवू शकतात. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ शुभ ठरेल. तुम्ही एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहणार आहे. कामाच्या ठिकाणी लोकांच्या छोट्या छोट्या समस्यांना महत्त्व देण्याऐवजी तुम्हाला तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. व्यावसायिकांसाठी थोडी आव्हानात्मक असू शकते. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी काही विशेष समस्येचा सामना करावा लागू शकतो.
कु्ंभ राशीच्या लोकांचा हा आठवडा शांतीने भरलेला राहणार आहे. नियोजित कामे तुमच्या इच्छेनुसार पूर्ण होताना दिसतील. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जर तुम्ही परदेशांशी संबंधित व्यवसाय करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला अनपेक्षित नफा मिळेल.
मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर राहणार आहे. आज तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुम्हाला इच्छित नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा आठवडा चांगला राहणार आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा आठवडा चांगला राहील. आर्थिक समस्या सुटू शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)