फोटो सौजन्य- istock
ऑगस्टचा महिना ग्रहांच्या हालचालीनुसार खूप खास मानले जाते. सूर्य, मंगळ, केतू आणि राहू ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी काही राशीच्या लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
ऑगस्टचा महिना ग्रहांच्या हालचालीसाठी खूप विशेष मानला जातो. यावेळी सूर्य सिंह राशीत प्रवेश करत असल्याने केतू आधीच उपस्थित असताना ग्रहण योग तयार होईल. कन्या राशीमध्ये मंगळाचे संक्रमण आणि शनिमुळे असलेला संघर्ष काही राशीच्या लोकांसाठी तणावपूर्ण असेल. राहू सूर्य आणि मंगळ सोबत राहिल्याने अशुभ योग तयार होईल. ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर विविध प्रकारे होऊ शकतो. या अशुभ परिणामामुळे काही राशीच्या लोकांना समस्यांना तोंड देखील द्यावे लागू शकते. कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांना या काळामध्ये गुंतागुंतीच्या समस्या जाणवू शकतात. या काळामधये तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो. कुटुंबामध्ये वाद निर्माण होऊ शकतात. तुमचा आत्मविश्वास मजबूत राहील, जो तुम्हाला अडचणींमधून बाहेर पडण्यास मदत होईल.
वृषभ राशीच्या लोकांचा हा काळ भावनिक चढ-उतारांनी भरलेला राहील. त्यामुळे जुने नातेसंबंध किंवा आठवणी मनाला त्रास देऊ शकतात. त्वचेशी संबंधित समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च करणे टाळा. धार्मिकतेकडे तुमचा कल जास्त राहू शकतो.
कन्या राशीच्या लोकांना या काळामध्ये खूप सावध राहावे लागेल. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना सावधानता बाळगायला हवी. प्रवास किंवा पैशांशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या. कामात अपेक्षित यश न मिळाल्याने तुम्ही निराश होऊ शकता. कोणालाही पैसे उधार देण्याचे टाळावे.
वृश्चिक राशीच्या लोकांचा हा काळ भावनिक चढ-उतारांनी भरलेला राहील. नातेसंबंध आणि आरोग्य यामध्ये सावधगिरी बाळगावी. विवाहित लोकांना तणावाचा सामना करावा लागू शकतो. मानसिक थकवा आणि डोकेदुखी सारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मीन राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. रागाच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. वाद टाळा आणि संयम ठेवा. त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. नातेसंबंधात असलेले मतभेद दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)