फोटो सौजन्य- pinterest
शुक्र ग्रहाने आज 1 ऑगस्ट रोजी पहाटे 3.51 वाजता मिथुन राशीमध्ये राहून राहूच्या आर्द्रा नक्षत्रात संक्रमण करेल. शुक्र ग्रह मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी दुपारी 2.14 वाजेपर्यंत आर्द्रा नक्षत्रात राहणार आहे. तर 21 ऑगस्ट रोजी तो मध्यरात्री 1.25 पर्यंत मिथुन राशीत राहील. ज्योतिषशास्त्रानुसार, आज सकाळी शुक्राने केलेले नक्षत्र संक्रमण काही राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतील. त्यासोबतच काही लोकांना असलेल्या समस्या हळूहळू संपू शकतात. तर बरेच लोक पूर्वीपेक्षा जास्त त्रासलेले राहतील. शुक्र ग्रहाच्या या नक्षत्र संक्रमणाचा परिणाम काही राशीच्या लोकांना प्रेम जीवन, सौंदर्य आणि आराम यावर होणार आहे. कारण शुक्र ग्रह या सर्वांचे प्रतिनिधित्व करतो. कोणत्या राशीच्या लोकांवर शुक्र ग्रहाच्या नक्षत्र संक्रमणाचा परिणाम होणार आहे ते जाणून घ्या
शुक्र ग्रहाचे नक्षत्र संक्रमण सिंह राशीच्या लोकांच्या कुंडलीमध्ये 11 व्या स्थानावर होणारे आहे. ज्यामुळे व्यक्तीच्या इच्छा, सामाजिक वर्तूळ आणि फायद्यांशी संबंधित आहे. अशा वेळी येत्या काळात सिंह राशीच्या लोकांच्या काही जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. या काळामध्ये नवीन लोकांची ओळख होईल. समाजामध्ये तुम्हाला प्रतिष्ठा मिळू शकेल. जे लोक बऱ्याच काळापासून आजारी आहेत त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल.
सिंह राशीव्यक्तिरिक्त शुक्र ग्रहाचे होणारे नक्षत्र संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आनंदाचे राहणार आहे. हे संक्रमण वृश्चिक राशीमध्ये आठव्या घरामध्ये होणार आहे. याचा संबंध लपलेले धन, बदल, मृत्यू आणि गूढतेशी संबंधित आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना पैसे मिळू शकतात. ज्यामुळे तुमच्यावर असलेले कर्जाच्या समस्या दूर होऊ शकतात. या काळामध्ये आरोग्य चांगले राहील. नात्यांमध्ये गोडवा राहील. वैवाहिक लोकांच्या जीवनात या काळात सकारात्मक बदल होतील.
कुंभ राशीच्या लोकांचा हा काळ चांगला असतो. यावेळी कुंडलीमध्ये पाचव्या स्थानावर आहे. ज्याचा संबंध जो प्रेम, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि मुलांशी संबंधित आहे. या महिन्यात तुमच्या असलेल्या समस्या दूर होतील. या काळात मुलांची बुद्धिमत्ता विकसित होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना पूर्वीपेक्षा चांगले गुण मिळवतील. ऑगस्ट महिना या काळात तुमच्यासाठी अनुकूल राहील. जे लोक कलेच्या क्षेत्रात कार्यरत आहे त्यांना नशिबाची साथ मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)