Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhadrapada Amavasya 2025: अमावस्येच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, सर्व समस्या होतील दूर 

भाद्रपद महिन्याच्या अमावस्येला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे. यालाच पिठोरी अमावस्या देखील म्हटले जाते. यावेळी ही अमावस्या शनिवार, 23 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी काही उपाय केल्यास फायदे होतात.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 23, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

भाद्रपद महिन्यातील अमावस्येला हिंदू धर्मामध्ये ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे स्थान आहे. यालाच पिठोरी अमावस्या किंवा कुशोत्पत्नी असे देखील म्हटले जाते. यावेळी या अमावस्येची सुरुवात शुक्रवार, 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11.55 वाजता होणार आहे आणि याची समाप्ती शनिवार, 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11. 35 वाजता होईल.

या दिवशी नदीमध्ये स्नान, दान, तर्पण आणि पितृपूजेला विशेष महत्त्व आहे. शास्त्रांनुसार, अमावस्येला राशीनुसार काही विशेष उपाय केल्याने पितृ दोष, शनि दोष आणि कालसर्प दोष यासारख्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते, त्याचबरोबर व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती येते. भाद्रपद अमावस्येला राशीनुसार कोणते उपाय करावे, जाणून घ्या

मेष रास

भाद्रपद अमावस्येला मेष राशीच्या लोकांनी सूर्योदयापूर्वी स्नान करुन तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला पाणी अर्पण करावे. पाणी अर्पण करताना ॐ सूर्याय नमः या मंत्रांचा जप करावा.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्रांचा जप करावा. त्यानंतर गरजूंना अन्नाचे वाटप करावे.

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी त्यासोबतच तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे. त्यानंतर ॐ नमो नारायणाय या मंत्रांचा जप करुन तिळाचे दान करावे.

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र बघणे निषिद्ध का मानले जाते? जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी चंद्राला दुधात मिसळलेले पाणी अर्पण करावे आणि ॐ सोमय नमः या मंत्रांचा जप करावा. त्यासोबतच पांढरे कपड्याचे दान करावे.

सिंह रास

अमावस्येच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी सूर्यदेवाची पूजा करावी आणि ॐ घृणी सूर्याय नमः या मंत्रांचा जप करावा. त्यानंतर वाहत्या पाण्यात तांब्याचे नाणे अर्पण करावे.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करावी. ॐ गं गणपतये नमः या मंत्रांचा जप करावा. त्यानंतर काळे तीळ आणि मोहरीचे तेलाचे दान करा.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून त्याला पाणी अर्पण करावे. ॐ शुक्राय नमः या मंत्रांचा जप करुन गरिबांना तांदूळ दान करावे.

वृश्चिक रास

अमावस्येच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमानाची पूजा करावी आणि हनुमान चालिसाचे पठण करावे. त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि काळ्या कपड्याचे दान करावे.

Budh Gochar: आश्लेषा नक्षत्रात असलेला बुध या राशीच्या लोकांना करणार मालामाल, चमकेल नशीब

धनु रास

धनु राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूला पिवळी फुले अर्पण करावी. त्यासोबतच ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करावा. तसेच पिवळे कपडे किंवा हळदीचे दान करावे.

मकर रास

मकर राशीच्या लोकांना अमावस्येच्या दिवशी शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. ॐ शनैश्चराय नमः या मंत्रांचा जप करावा. या लोकांनी लोखंडाच्या वस्तू दान कराव्यात.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांनी अमावस्येच्या दिवशी नीलम रत्न परिधान करावे. त्यानंतर शनिदेवाची पूजा करुन ॐ शं शनैश्चराय नमः या मंत्रांचा जप करावा. काळे तीळ आणि उडीद डाळ दान करा.

मीन रास

अमावस्येच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी भगवान शिव यांना दूध आणि गंगाजलाने अभिषेक करावा. त्यानंतर ॐ नमः शिवाय या मंत्रांचा जप करुन पाण्यात काळे तीळ अर्पण करावे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Bhadrapada amavasya 2025 do these remedies according to your zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Grah Gochar: होळीच्या दिवशी शुक्र ग्रह तयार करणार मालव्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार मोठी संधी
1

Grah Gochar: होळीच्या दिवशी शुक्र ग्रह तयार करणार मालव्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार मोठी संधी

Chanakya Niti: या ठिकाणी पैसे दान केल्याने मिळते सन्मान आणि आर्थिक लाभ
2

Chanakya Niti: या ठिकाणी पैसे दान केल्याने मिळते सन्मान आणि आर्थिक लाभ

Chandra Grahan 2026: 3 मार्चला चंद्रग्रहण, कन्या आणि इतर राशीच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे बदल
3

Chandra Grahan 2026: 3 मार्चला चंद्रग्रहण, कन्या आणि इतर राशीच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे बदल

Holi 2026: होळीच्या दिवशी रंगांनी का खेळले जाते? वेगवगेळ्या रंगांचे काय आहे महत्त्व
4

Holi 2026: होळीच्या दिवशी रंगांनी का खेळले जाते? वेगवगेळ्या रंगांचे काय आहे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.