Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhai Dooj 2026: बहिणीच्या राशीनुसार द्या खास भेटवस्तू; चमकेल तिचं नशीब

Bhai Dooj 2026: भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि नात्यातील जिव्हाळ्याचा सण आहे. यंदा 11 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार असून टिळा लावण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 1:10 ते 3:20 असा आहे. यंदा बहिणीला नेहमीपेक्षा वेगळी भेट द्यायची असेल

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 10, 2026 | 02:42 PM
Bhai Dooj 2026: (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Bhai Dooj 2026: (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • भाऊबीजेला बहिणीच्या राशीनुसार निवडा खास गिफ्ट.
  • मेष ते मीन, प्रत्येक राशीसाठी वेगळी भेटवस्तू.
  • भाऊबीजेचा शुभ मुहूर्त 11 नोव्हेंबर, दुपारी 1:10 ते 3:20.

भाऊबीज २०२६ः भाऊबीजचा सण भाऊ आणि बहिणीमधील अतूट नाते आणि प्रेमाचे प्रतीक आहे. दिवाळीनंतर येणारा हा सण दोघांसाठीही खूप खास असतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी व सुखासाठी प्रार्थना करतात. भाऊदेखील आपल्या बहिणींना भेटवस्तू देऊन त्यांना विशेष महत्त्व देतात.

भाऊबीज म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते बहिणीचं प्रेम. दिवाळी संपली की भाऊबीज येते. त्या दिवशी बहीण भावाला ओवाळते, कपाळावर टिळा लावते, आणि त्याच्या चांगल्यासाठी देवाकडे मागत असते. भाऊ पण मग बहिणीला काहीतरी देऊन तिला खुश करतो. पण नेमकं हेच अवघड असतं. Bhai Dooj 2026:

बहिणीला काय द्यावं?

प्रत्येक वर्षी हाच प्रश्न पडतो. साडी देऊ का? पैसे देऊ का? काहीतरी वेगळं देऊ का? बहिणीला आवडेल असं आणि शुभ पण असेल असं काहीतरी द्यायचं असतं. म्हणून यावेळी एक वेगळी आयडिया करून बघा. बहिणीच्या राशीनुसार गिफ्ट घ्या. ज्योतिषात प्रत्येक राशीसाठी काही रंग, काही वस्तू चांगल्या मानल्या जातात. तसं गिफ्ट घेतलं तर बहिणीला पण भारी वाटेल.

आधी मुहूर्त लक्षात घ्या

यावर्षी भाऊबीज ११ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल. टिळा लावण्याचा शुभ मुहूर्त दुपारी १:१० ते ३:२० पर्यंत आहे. या शुभ मुहूर्तावर बहिणी आपल्या भावांना टिळा लावून त्यांना शुभेच्छा देऊ शकतात.म्हणजे 11 नोव्हेंबरला दुपारी 1:10 ते 3:20 या वेळेत ओवाळणी करायची आहे. ही वेळ लक्षात ठेवा. या वेळेतच टिळा लावा.

Bhau Beej 2026: भाऊबीज का साजरी केली जाते? यमराज-यमुना आणि श्रीकृष्ण-सुभद्रेच्या पौराणिक कथा जाणून घ्या

कोणत्या राशीच्या बहिणीला काय द्यावं.

मेष –
मेष राशीच्या बहिणींना नवीन आणि रोमांचक गोष्टी आवडतात. त्यांना एकाच जागी बसून राहणं जमत नाही. त्यांना जिमचं सामान, खेळाचं सामान, किंवा कुठेतरी फिरायला जायचं व्हाउचर दिलं तर त्या खूप खुश होतील.

वृषभ –
वृषभ राशीच्या भगिनींना सुंदर आणि आलिशान वस्तू आवडतात. त्यांना चांगल्या गोष्टींची हौस असते. त्यांना एखादा छान दागिना, रेशमी साडी किंवा घरात ठेवायची एखादी सुंदर शोपीस वस्तू दिली तर बेस्ट.

मिथुन –
मिथुन राशीच्या बहिणीला पाचू लावलेली सोन्याची किंवा चांदीची अंगठी दिली तर खूप शुभ मानलं जातं. नाहीतर एखादी स्टायलिश अॅक्सेसरी, कानातले, ब्रेसलेट असं काहीतरी दिलं तरी चालेल.

कर्क –
कर्क राशीच्या बहिणीला भाऊबीजला पांढरे कपडे देणं चांगलं मानतात. पांढरा सूट, पांढरी साडी, किंवा पांढऱ्या रंगाचा एखादा सुंदर ड्रेस दिला तर तिला आवडेल.

सिंह –
सिंह राशीच्या भगिनींना स्टायलिश आणि फॅशनेबल गोष्टी आवडतात. त्यांना सगळ्यात हटके दिसायचं असतं. त्यांना डिझायनर ड्रेस, छान दागिने किंवा लाल रंगाची एखादी खास वस्तू द्या. त्या लगेच खुश होतील.

कन्या –
कन्या राशीच्या बहिणीला पाचूचे दागिने किंवा पाचूच्या हिरव्या रंगाची एखादी वस्तू द्या. हिरवा रंग त्यांच्यासाठी शुभ मानला जातो. एखादी हिरवी साडी किंवा हिरव्या रंगाची अॅक्सेसरी पण चालेल.

तूळ –
तूळ राशीच्या भगिनींना स्टायलिश आणि दर्जेदार गोष्टी आवडतात. त्यांना एखादा चांगला परफ्यूम, डिझायनर घड्याळ किंवा एखादी सुंदर कलाकृती दिली तर त्या खूप खुश होतील.

वृश्चिक –
वृश्चिक राशीच्या बहिणीला एखादा चांगला परफ्यूम, सुंदर दागिने किंवा तिचं आवडतं पुस्तक द्या. तिला वाचायची आवड असेल तर तिच्या आवडत्या लेखकाचं पुस्तक दिलं तर त्यासारखं दुसरं गिफ्ट नाही.

BhauBeej 2026: ओवाळणीच्या ताटात पैसे का ठेवतात? जाणून घ्या त्यामागील धार्मिक महत्त्व आणि कारणे

धनु –
धनु राशीच्या बहिणींना प्रवास करायला आणि नवीन ठिकाणे पाहायला आवडते. त्यांना एकाच जागी राहायला आवडत नाही. त्यांना ट्रॅव्हल बॅग, स्टायलिश बॅकपॅक किंवा एखाद्या ट्रिपचं व्हाउचर दिलं तर त्या खूप खुश होतील.

मकर –
मकर राशीच्या बहिणीला तिच्या गरजेनुसार गिफ्ट द्या. ती नोकरी करत असेल तर एखादी ऑफिस बॅग, छान घड्याळ किंवा टेबलावर ठेवायचा ऑर्गनायझर द्या. ती शिकत असेल तर एखादं गॅझेट, स्टडी लॅम्प किंवा स्टेशनरी सेट द्या.

कुंभ –
कुंभ राशीच्या भगिनींना नवीन तंत्रज्ञान आणि गॅझेट्स आवडतात. त्यांना ब्लूटूथ स्पीकर, वायरलेस इअरबड्स किंवा स्मार्ट पाण्याची बाटली दिली तर त्या खुश होतील.

मीन –
मीन राशीच्या भगिनींसाठी एक सुंदर घरातील रोपटे किंवा आकर्षक कुंडी ही एक चांगली भेट ठरू शकते. त्यांना निसर्गाजवळ राहायला आवडतं. एखादं छान रोपटं दिलं तर त्या त्याची खूप काळजी घेतील.

शेवटी काय, गिफ्ट किती महाग आहे, याला महत्त्व नाही. ते प्रेमाने दिलंय, याला महत्त्व आहे. राशीनुसार दिलं तर बहिणीला वाटेल, भावाने माझ्यासाठी विचार करून आणलंय. आणि हेच खरं भाऊबीजचं प्रेम आहे.

Web Title: Bhai dooj 2026 zodiac sign wise gift ideas for sister rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 02:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.