Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bodan ritual: बोडण विधी म्हणजे काय? चित्पावन ब्राह्मण समाजातील या अनोख्या कुलाचाराचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Bodan ritual: कोकणस्थ (चित्पावन) ब्राह्मण समाजात बोडण हा एक महत्त्वाचा पारंपरिक कुलाचार मानला जातो. अन्नपूर्णा आणि कुलदेवीच्या पूजेसाठी केला जाणारा हा विधी नेमका कसा असतो, तो कधी करतात आणि त्यामागील धार्मिक महत्त्व काय आहे? जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 15, 2026 | 11:50 AM
फोटो सौजन्य- गुगल

फोटो सौजन्य- गुगल

Follow Us
Follow Us:
  • बोडण हा प्रामुख्याने कोकणस्थ (चित्पावन) ब्राह्मण समाजातील पारंपरिक कुलाचार आहे.
  • घरात लग्न, मुंज, वास्तुशांती किंवा अपत्यजन्मानंतर बोडण भरण्याची प्रथा आहे.
  • बोडणासाठी मंगळवार, शुक्रवार आणि रविवार हे दिवस शुभ मानले जातात.
 

बोडण हा प्रामुख्याने कोकणस्थ (चित्पावन) ब्राह्मण समाजातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचा पारंपरिक कुलधर्म किंवा कुलाचार आहे. हा विधी प्रामुख्याने अन्नपूर्णा आणि कुलदेवीच्या (आदिशक्ती) कृपाशीर्वादासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जातो.

‘बोडण’ शब्दाची व्युत्पत्ती आणि धार्मिक महत्त्व

‘बोडण’ हा शब्द मूळ संस्कृत ‘ब्रह्मोदन’ किंवा ‘बहुधन’ या शब्दांचा अपभ्रंश असावा असे मानले जाते. तसेच व्युत्पत्तीशास्त्रज्ञ कृ. पां. कुलकर्णी यांच्या मते, ‘मोटन’ (विघ्नांचे चूर्ण करणे) या शब्दापासून ‘बोडन’ किंवा ‘बोडण’ हा शब्द तयार झाला आहे.

बोडणचे आध्यात्मिक महत्त्व

महिषासुरासारख्या दैत्यांचा संहार करणाऱ्या आदिशक्तीचे व अन्नपूर्णेचे स्मरण करून घरात सुख-समृद्धी, वंशवृद्धी आणि आरोग्य नांदावे, यासाठी हा विधी केला जातो. स्त्रीशक्तीचा सन्मान करणे हा या विधीचा मुख्य गाभा आहे.

बोडण कधी करतात?

प्रत्येक घराण्याच्या कुलाचाराप्रमाणे बोडण भरण्याचे नियम थोडेफार वेगळे असू शकतात. पण तरीसुद्धा कोणत्या प्रसंगी हा विधी प्रामुख्याने केला जातो. ते पाहूया

Jatayu Temple: रामायणातील जटायूंचे बलिदान आठवण करून देतात ही मंदिरे; जाणून घ्या जटायू मंदिरांचा रंजक इतिहास

शुभकार्यानंतर का केले जाते

घरात विवाह (लग्न), उपनयन (मुंज), वास्तुशांती किंवा अपत्यजन्म यांसारखे मोठे मंगल कार्य पार पडल्यानंतर कुलदेवीचे आभार मानण्यासाठी बोडण भरले जाते. तसेच वार्षिक किंवा त्रैवार्षिक पद्धत आहे. काही घराण्यांमध्ये दरवर्षी (उदा. नवरात्रात दसऱ्याच्या दिवशी किंवा मार्गशीर्ष महिन्यात) तर काही घराण्यांमध्ये दर तीन वर्षांनी बोडण भरण्याची प्रथा असते.

योग्य दिवस आणि वर्ज्य महिने

बोडण भरण्यासाठी मंगळवार, शुक्रवार किंवा रविवार हे देवीचे वार शुभ मानले जातात. चातुर्मास (आषाढ ते कार्तिक), पौष आणि चैत्र हे महिने बोडणासाठी वर्ज्य मानले जातात. (अपवादात्मक परिस्थितीत कुलाचारानुसार नवरात्रातही काही जण हा विधी करतात). तर हा संपूर्ण विधी आणि स्वयंपाक सुचिर्भूतपणे करून दुपारी १२ वाजेच्या आत पूर्ण करण्याची परंपरा आहे.

बोडण विधीची संपूर्ण पद्धत

बोडण हा स्त्रियांच्या पुढाकाराने होणारा अत्यंत देखणा आणि सात्त्विक सोहळा आहे.

सवाष्णी आणि कुमारिकेचे निमंत्रण

या विधीसाठी घरातील १ आणि बाहेरील ३ अशा एकूण ४ सवाष्णी (विवाहित स्त्रिया) आणि १ कुमारिका (साधारण ४ ते ९ वयोगटातील लहान मुलगी) यांना सन्मानाने आमंत्रित केले जाते. काही घराण्यांत बाहेरील ५ सवाष्णी बोलावण्याचीही पद्धत आहे. आमंत्रित सवाष्णी व कुमारिकेला तेल-शिकेकाई देऊन सुस्नान घालण्याची किंवा घरी आल्यावर तुळशीपाशी त्यांचे पाय कोमट पाणी व दुधाने धुवून, औक्षण करून व खणा-नारळाने ओटी भरून स्वागत करण्याची पद्धत आहे.

पूजेची मांडणी कशी करावी

पाटावर किंवा चौरंगावर बोडणाची विशिष्ट रांगोळी काढली जाते. त्यावर लाकडी काथवट किंवा स्वच्छ कल्हई केलेली पितळेची मोठी परात ठेवली जाते. मध्यभागी देवघरातील अन्नपूर्णेची मूर्ती आणि बाजूला सुपारीचा गणपती मांडला जातो.

Dream Meaning: स्वप्नात छठ पूजा दिसणे शुभ की अशुभ? स्वप्नशास्त्रात काय सांगितला आहे अर्थ

कणकेचे दागिने आणि दिवे लावतात

कणकेपासून (गव्हाच्या पिठापासून) देवीसाठी सिंहासन, दागिने (नथ, मंगळसूत्र, बांगड्या, वेणी इ.) आणि ५ लहान दिवे तयार करून ते परातीत मांडले जातात.

पूजन कसे करावे आणि नैवेद्य काय असावे

घरातील यजमान स्त्रीकडून गणपती व अन्नपूर्णेची पंचामृती व षोडशोपचारे पूजा केली जाते. या दिवशी सोवळ्यात पुरणपोळी, वरण-भात, भाजणीचे वडे, भोपळ्याचे घारगे असा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला जातो व परातीतील देवीला ५ नैवेद्य दाखवले जातात. तर आरती झाल्यानंतर चांदीच्या संध्येच्या पळीने (सोन्याचा दागिना किंवा चेन पळीला लावून) परातीतील दिव्यांवर दुधाची धार धरून ते शांत केले जातात. त्यानंतर परातीतील पंचामृत, दूध, तूप, पुरण, भात, वडे आणि कणकेचे सर्व अलंकार व दिवे एकत्र केले जातात.

सर्व सवाष्णी व कुमारिका मिळून मंत्रोच्चारात किंवा देवीचा जयजयकार करत हे सर्व पदार्थ एकत्र कालवतात. तर कालवलेल्या बोडणातील थोडा भाग ‘अंगारा’ किंवा प्रसाद म्हणून कपाळाला लावला जातो किंवा चाखला जातो. उरलेले सर्व बोडण अत्यंत पवित्र मानले जाते. ते इतर कोणत्याही प्राण्याला न देता केवळ गाईलाच खाऊ घालण्याची किंवा वाहत्या स्वच्छ पाण्यात विसर्जित करण्याची सक्त परंपरा आहे.

चित्पावन ब्राह्मणांव्यतिरिक्त अन्य लोक बोडण करतात का?

केवळ चित्पावन ब्राह्मणांचे वैशिष्ट्य. बोडण हा कुलाचार संपूर्ण भारतात केवळ कोकणस्थ (चित्पावन) ब्राह्मण समाजातच आढळतो. देशस्थ, कऱ्हाडे, सारस्वत किंवा इतर कोणत्याही ब्राह्मण पोटजातींमध्ये अथवा अन्य समाजांमध्ये हा विधी प्रचलित नाही. पण सर्वच चित्पावन ब्राह्मण घराण्यांमध्ये बोडण असतेच असे नाही.

कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये काही घराण्यांचा कुलधर्म ‘बोडण’ असतो, तर काही घराण्यांचा कुलधर्म ‘गोंधळ’ किंवा ‘महालक्ष्मी पूजन’ असतो. त्यामुळे विवाह होऊन सासरी गेलेली मुलगी आपल्या सासरच्या घराण्याच्या परंपरेनुसार हा विधी करते. पण जरी ‘बोडण’ हा नेमका विधी इतर समाजांत नसला, तरी देवीच्या सन्मानार्थ केल्या जाणाऱ्या इतर प्रथा अन्य समाजांत पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, देशस्थ ब्राह्मण व मराठा समाजात कुलदेवतेचा गोंधळ किंवा जागरण घालण्याची प्रथा आहे, तर काही समाजांत मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे व्रत किंवा नवरात्रात कुमारिका व सवाष्णी पूजन केले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बोडण विधी म्हणजे काय?

    Ans: बोडण हा प्रामुख्याने कोकणस्थ (चित्पावन) ब्राह्मण समाजातील कुलाचार असून अन्नपूर्णा आणि कुलदेवीच्या पूजेसाठी केला जातो.

  • Que: बोडण भरण्यासाठी कोणता दिवस शुभ मानला जातो?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार मंगळवार, शुक्रवार आणि रविवार हे देवीच्या उपासनेसाठी शुभ मानले जातात.

  • Que: बोडण विधीसाठी किती सवाष्णी आणि कुमारिका बोलावतात?

    Ans: काही घराण्यांमध्ये चार सवाष्णी आणि एका कुमारिकेला आमंत्रित करण्याची पद्धत आहे. घराण्यानुसार संख्येत बदल होऊ शकतो.

Web Title: Bodan ritual significance and method pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Jatayu Temple: रामायणातील जटायूंचे बलिदान आठवण करून देतात ही मंदिरे; जाणून घ्या जटायू मंदिरांचा रंजक इतिहास
1

Jatayu Temple: रामायणातील जटायूंचे बलिदान आठवण करून देतात ही मंदिरे; जाणून घ्या जटायू मंदिरांचा रंजक इतिहास

Dream Meaning: स्वप्नात छठ पूजा दिसणे शुभ की अशुभ? स्वप्नशास्त्रात काय सांगितला आहे अर्थ
2

Dream Meaning: स्वप्नात छठ पूजा दिसणे शुभ की अशुभ? स्वप्नशास्त्रात काय सांगितला आहे अर्थ

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Vrishchik Sankranti: कधी आहे वृश्चिक संक्रांती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Vrishchik Sankranti: कधी आहे वृश्चिक संक्रांती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.