
फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध ग्रह 7 जानेवारी रोजी पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या नक्षत्रावर शुक्र ग्रहाचे राज्य असते जो संपत्ती, सौंदर्य, प्रेम आणि कला यांचे प्रतिनिधित्व करतो. बुद्धिमत्ता, वाणी आणि व्यवसायासाठी जबाबदार असलेला बुध ग्रह शुक्राच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे, काही राशीच्या लोकांना व्यवसाय, नोकरी, शिक्षण आणि आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात नवीन सौदे आणि फायदेशीर संधी मिळू शकतात. बुधाच्या नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घेऊया
बुधाच्या नक्षत्र संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांना संपत्तीत आणि समृद्धीत वाढ होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन उपक्रम किंवा प्रकल्पांमध्ये यश मिळू शकते. तसेच या काळात नशिबाची देखील उत्तम साथ मिळेल. परदेशात काम करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. बुध ग्रहाच्या प्रभावाखाली तुम्ही प्रभावशाली लोकांशी संवाद साधाल आणि तुमचा व्यवसाय भरभराटीला येईल. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे नक्षत्र संक्रमण फायदेशीर राहील. नोकरी करणाऱ्या लोकांची या काळामध्ये पदोन्नती होऊ शकते. कामाच्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट कामासाठी तुमची ओळख देखील होऊ शकते. जर तुम्ही पूर्वी पैसे गुंतवले असल्यास तुम्हाला ते परत मिळू शकतात. तुम्ही वाहनाची खरेदी करु शकता. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना त्यांच्या हव्या असलेल्या संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ चांगला राहील. या काळात व्यवसायात अपेक्षित वाढ होईल.
कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे नक्षत्र संक्रमण चांगले राहील. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील. व्यवसायामध्ये अपेक्षित वाढ होईल. या काळात तुम्ही नवीन प्रकल्पांची देखील सुरुवात करु शकता. मानसिक शांती मिळेल. पैशांची गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठे बदल घडतील. नोकरी करणाऱ्या लोकांवर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुमची समाजात प्रतिष्ठा वाढेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: बुध ग्रह जेव्हा एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्याला बुध नक्षत्र गोचर असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रात हा गोचर बुद्धी, संवाद, करिअर आणि व्यापारावर परिणाम करतो.
Ans: या गोचरामुळे नोकरीत नवीन संधी, इंटरव्ह्यू कॉल्स, पदोन्नती, बदली किंवा चांगल्या ऑफर्स मिळण्याची शक्यता वाढते, विशेषतः संवाद आणि कौशल्यावर आधारित क्षेत्रात.
Ans: व्यवसायात नवीन करार, ग्राहकवाढ, मार्केटिंग यश, ऑनलाईन किंवा ट्रेडशी संबंधित कामात प्रगती होण्याचे संकेत असतात.