फोटो सौजन्य- pinterest
आज बुधावार, 7 जानेवारीचा दिवस. चंद्र दिवसरात्र सिंह राशीतून संक्रमण करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाशी सूर्यासोबत युती होणार आहे. त्यामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रामुळे आयुष्मान योग देखील तयार होणार आहे. या योगाचा शुभ अशुभ परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होऊ शकतो. बुधादित्य योगाचा फायदा कोणत्या राशीच्या लोकांना होणार आहे ते जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योग फायदेशीर राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमच्या वरिष्ठांच्या पाठिंब्याने तुम्ही तुमच्या कारकिर्दीत प्रगती करण्यात यशस्वी व्हाल. तुमचे महत्त्वाचे काम वेळेवर पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्हाला अल्पकालीन गुंतवणुकीतून नफा मिळू शकेल. आज तुम्ही वाहनाची खरेदी करु शकता.
बुध आणि सूर्याच्या युतीमुळे मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. यावेळी तुम्हाला सरकारी कामामध्ये अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून काही कामासाठी प्रोत्साहन मिळेल. आर्थिक लाभदेखील होऊ शकतो. बॅंकेशी संबंधित असलेले कोणतेही काम वेळेवर पूर्ण होऊ शकते. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची अपेक्षित साथ मिळेल. तुमच्या आर्थिक योजना आणि प्रयत्नांचे फायदे तुम्हाला मिळू शकतील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असल्यास ते तुम्हाला परत मिळू शकतात. आज तुम्हाला एखाद्या मित्राकडून किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून अपेक्षित पाठिंबा मिळू शकतो. तुमच्या मोठ्या भावंडांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आदर आणि प्रतिष्ठा वाढवेल. यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी तसेच सामाजिक क्षेत्रात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. कामाच्या ठिकाणी आज अनुकूल वातावरण राहील. तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करू शकाल. तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळेल. मालमत्तेशी संबंधित कामातूनही फायदा होईल.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्हाला परदेशी स्रोतांकडूनही फायदा होऊ शकतो. कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमच्या वडिलांकडून तुम्हाला फायदा होईल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला धाडसी कृती आणि निर्णयांचा फायदा होऊ शकतो. मुलांच्या बाबतीत तुम्हाला आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






