
फोटो सौजन्य- istock
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी राहूच्या स्वाती नक्षत्रात प्रवेश केला आहे. बुध ग्रहाने आज मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ५:५३ वाजता प्रवेश केला आहे. बुधाच्या नक्षत्र बदलामुळे मिथुन आणि कन्या राशीसह चार राशींना शुभ फळे मिळू शकतात. या राशींना प्रगतीचे मार्ग दिसू शकतात आणि त्यांच्या करिअर व आर्थिक स्थितीतही सुधारणा होऊ शकते. बुधाच्या नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे जाणून घ्या
मिथुन राशींचा बुध ग्रह हा स्वामी ग्रह आहे. तो तुमच्या कुंडलीमध्ये पाचव्या स्थानात आहे. पंचम स्थानात असताना, बुध आपले नक्षत्र बदलेल, ज्यामुळे तुम्हाला अत्यंत शुभ फळे मिळू शकतात. बुधाचे स्वाती नक्षत्रातून होणारे संक्रमण तुमच्या तार्किक क्षमता वाढवेल. तुम्ही कामाच्या ठिकाणी प्रत्येक कार्य वेळेवर पूर्ण करू शकाल, ज्यामुळे प्रगतीच्या संधी निर्माण होतील. या राशीत जन्मलेल्या ज्या व्यक्ती लेखन, कला आणि माध्यम यांसारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, त्यांना लक्षणीय फायदा होऊ शकतो.
कन्या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे हे नक्षत्र संक्रमण तुमच्या राशींमध्ये दुसऱ्या घरात होणार आहे. बुधाच्या या नक्षत्र संक्रमणामुळे आर्थिक स्थितीला चालना मिळणार आहे. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळू शकतात. काही नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळण्याचीही शक्यता आहे. वडिलोपार्जित व्यवसायात गुंतलेल्यांना नफा मिळू शकतो. तुमची वाणीही मधुर होईल, ज्यामुळे तुम्हाला सामाजिक स्तरावर अत्यंत शुभ परिणाम मिळू शकतात.
धनु राशींच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण अकराव्या घरात होणार आहे. जेव्हा बुध आपले नक्षत्र बदलेल, तेव्हा तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात व्यावसायिक आपला व्यवसाय वाढवू शकतात. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना अधिक जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून मिळणारे मार्गदर्शन प्रगतीचे मार्ग खुले करेल.
मकर राशीच्या लोकांना बुधाचे नक्षत्र संक्रमण खूप शुभ ठरू शकते. तुम्हाला या काळात अपेक्षित यश मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला उच्च पदही मिळू शकते. कामासंबंधित प्रवास फायदेशीर ठरू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: बुध ग्रह एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो, त्याला बुध नक्षत्र गोचर असे म्हणतात
Ans: बुध ग्रह राहूच्या स्वाती नक्षत्रात प्रवेश करणार आहे
Ans: बुध ग्रहाच्या नक्षत्र प्रवेशावेळी मिथुन, कन्या, धनु आणि मकर राशींच्या लोकांना फायदा होणार आहे