फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचा राजकुमार असलेला बुध ग्रह आपली वक्री आज 18 जुलै रोजी करत आहे. सकाळी 10.33 वाजता तो कर्क राशीमध्ये वक्री होणार आहे. तर 11 ऑगस्ट रोजी दुपारी 12.59 वाजता कर्क राशीमधून वक्री होईल म्हणजे मागे फिरणार आहे. यामुळे बुध ग्रहाच्या वक्री स्थितीमुळे विचार, संवाद आणि भूतकाळातील कृतींचे पुनर्मूल्यांकन करू शकतो. कर्क राशीत बुध ग्रहाच्या वक्रीचा परिणाम भावनिक आणि कौटुंबिक जीवनावर प्रामुख्याने दिसून येईल. तसेच आर्थिक बाबींचे पुनर्मूल्यांकन करुन अनपेक्षित खर्च किंवा गुंतागुंत करणे टाळणे महत्त्वाचे ठरते.
बुध ग्रहाच्या होणाऱ्या वक्रीमुळे गैरसमज आणि संवादात तांत्रिक समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे सावधगिरी बाळगावी लागेल. कर्क राशीचा स्वभाव भावनिक आणि घरगुती असतो, त्यामुळे या काळात कौटुंबिक संबंध, भावनिक स्पष्टता आणि आत्म-मूल्यांकन सुधारण्याची आवश्यकता असू शकते. जर तुम्ही दीर्घकाळापासून समस्येचा सामना करत आहात, आत्मविश्वास वाढणे आणि नवीन दृष्टिकोन स्वीकारण्याची तयारी दाखवणे या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. कर्क राशीतील बुध ग्रहाचा कोणत्या राशीच्या लोकांवर प्रभाव होईल, जाणून घ्या
बुध ग्रहाचे वक्रदृष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बुध ग्रह वृषभ राशीमध्ये तिसऱ्या भावामध्ये आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. या काळामध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. त्यासोबतच मालमत्ता, रियल इस्टेट यांसारख्या क्षेत्रांशी संबंधित असलेल्या लोकांना प्रगती होऊ शकते. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. बुध ग्रहाच्या आशीर्वादाने अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
शनि आणि बुध ग्रहाच्या वक्रीचा परिणाम कर्क राशीच्या लोकांवर सकारात्मक होऊ शकतो. कारण बुध ग्रह आपल्या राशीमध्ये वक्री होत आहे. या लोकांना नशिबाची साथ लाभेल. त्यासोबतच तुम्ही कामानिमित्ताने लांब पल्ल्याचा प्रवास करु शकता. बुध ग्रह या राशीमध्ये तिसऱ्या आणि बाराव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी खर्च करताना सांभाळून करावे. अनावश्यक खर्च करणे टाळावे. तुम्हाला व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल.
मकर राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाची वक्री या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. कारण बुध ग्रह या राशीमध्ये सातव्या स्थानावर असल्याने ते वक्री स्थितीत असतील. यामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. जु्न्या गुंतवणुकीतून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)