फोटो सौजन्य- pinterest
बुध आणि मंगळ हे दोन्ही ग्रह ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचे आहेत. कुंडलीमध्ये या ग्रहांची स्थितीमुळे व्यक्तीच्या जीवनावर त्याचा परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ ग्रहाला ग्रहांचा राजा म्हटले जाते. मंगळ ग्रह हा धैर्य, शौर्य, ऊर्जा आणि युद्धाचा प्रतीक मानले जाते. तर बुध ग्रहाला राजा म्हणून ओळखले जाते. बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, वाणी, तर्क आणि संवादाचा कारक मानला जातो. या युतीचा परिणाम काही राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो.
मंगळ ग्रह सोमवार, 28 जुलै रोजी संध्याकाळी 7.58 वाजता कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर ग्रहाचा अधिपती मानला जाणारा बुध ग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. मंगळ आणि बुध ग्रह यांच्यात मैत्रीचे संबंध नसल्याने काही राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. या ग्रहाच्या होणाऱ्या युतीमुळे त्या राशीतील व्यक्तीला करिअर, नोकरी, व्यवसाय आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
मंगळ आणि बुध ग्रहांच्या युतीमुळे मिथुन राशीच्या लोकांमधील ताण वाढू शकतो. यावेळी तुम्ही नोकरी, करिअर आणि शिक्षणात खूप चढ-उतार जाणवतील. त्यामुळे तुम्हाला सकारात्मक उर्जेचा अभाव जाणवू शकतो. या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. ज्या लोकांना व्यवसायामध्ये समस्या आहेत अशा लोकांच्या समस्या दूर होतील. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होण्यात अडथळे येऊ शकतात.
तूळ राशीच्या लोकांना मंगळ आणि बुध ग्रहांच्या युतीमुळे अनपेक्षित समस्यांना तोंड द्यावे लागेल. जे लोक व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये काम करत आहे अशा लोकांना पैशाच्या व्यवहारात काळजी घ्या. या काळामध्ये तूळ राशीच्या लोकांनी प्रवास करणे टाळणे चांगले मानले जाते. वर्तनावर खूप नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता कमी आहे. कुटुंबातील सदस्यांच्या भावनांची विशेष काळजी घ्या.
धनु राशीच्या लोकांमध्ये नातेसंबंधामध्ये गैरसमज असल्यास तुमच्या जोडीदारातील अंतर वाढू शकते. तसेच आरोग्याच्या समस्या देखील वाढू शकतात. करिअरमध्ये तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या काळामध्ये तुमचा आर्थिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. तसेच पैशाच्या कमतरतेमुळे तुमच्यावरील तणाव वाढू शकतो. ग्रहांच्या युतीमुळे तुमच्या मानसिक स्थितीवर देखील परिणाम होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)