फोटो सौजन्य- pinterest
बुधवार, 16 जुलै रोजी चंद्र मीन राशीत संक्रमण करणार आहे. बुध हा स्वामी ग्रह असल्याने कर्क राशीमध्ये संक्रमण करेल. सूर्याच्या या संक्रमणामुळे सूर्य आणि बुध यांच्यात युती होणार आहे. ज्यामुळे बुधादित्य योग तयार होईल. तर चंद्र यांच्यात केंद्र योग तयार होईल. बुधादित्य योगामुळे कन्या राशीच्या लोकांसह इतर काही राशीच्या लोकांना लाभ होणार आहे. तसेच या लोकांना करिअर आणि व्यवसायात अनेक फायदे होणार आहे. कामाच्या ठिकाणी या लोकांना तुम्हाला महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. तर काही राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. कोणत्या भाग्यवान राशी आहेत त्या जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. या लोकांना करिअर आणि व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा करण्याचे टाळा. नोकरी करणाऱ्यांना प्रगतीच्या संधी मिळतील. तसेच पदोन्नती देखील मिळू शकते. समाजामध्ये तुमचा आदर आणि सन्मान वाढलेला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील.
मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला राहील. तुम्हाला नियोजित कामामध्ये गती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला फायदा होईल. तसेच तुम्हाला वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. लिस, सैन्य, सुरक्षा इत्यादींशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर असणार आहे. या लोकांची प्रलंबित सर्व कामे पूर्ण होतील. व्यवसायानिमित्त तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्यात आध्यात्मिक जाणीव निर्माण होऊ शकते. धार्मिक कार्यात रस घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नातेसंबंधात गोडवा राहील.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. जर तुम्ही व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या लोकांना करिअर आणि व्यवसायात अपेक्षित लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होऊ शकतात. माध्यम, प्रकाशन, लेखन, संशोधन इत्यादी क्षेत्रांशी संबंधित लोकांना फायदे होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)