shree ram (फोटो सौजन्य- pinterest)
चैत्र नवरात्रीची सुरवात झाली आहे. राम नवमी ६ एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे. या दरम्यान एक उपाय सगळ्यांनी केला पाहिजे. याने तुम्हाला श्री राम आणि हनुमानजींचे आशीर्वाद तर मिळतीलच, शिवाय तुमचे सुख आणि समृद्धीही वाढेल.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची करा पूजा, जाणून घ्या
रामनवमी काही दिवसात आहे. या दिवशी भारतात श्री रामाची पूजा अर्चना करण्यात येते. रामनवमीला योग्य विधींनी भगवान रामाची पूजा केल्याने भगवान हनुमानजी जीवनातील सर्व संकटे दूर करतात असे मानले जाते. रामनवमीच्या दिवशी हनुमानजींची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.
हनुमानजीची पूजा केल्याने भगवान राम अत्यंत प्रसन्न होतात. तेच ज्योतिष शाश्त्रानुसार काही वस्तू अश्या आहेत जे रामनवमीच्या आधी घरी आणल्यास घरात धन समृद्धी येते आणि कोणत्याच प्रकारचे संकट राहत नाही. चला जाणून घेऊयात रामनवमीच्या आधी कोणते वस्तू घरी आणले पाहिजे.
राम आणि हनुमानाचा मिळेल आशीर्वाद
या वर्षी रामनवमी ६ एप्रिलला साजरी करण्यात येत आहे. पुराणानुसार, भगवान राम यांचा जन्म या दिवशी झाला होता. काही वस्तू श्री रामाला अत्यंत प्रिय आहे. जर रामनवमीच्या आधी हे वस्तू घरी आणत असाल तर श्री राम आणि हनुमानजींच्या आशीर्वादाचे वर्षाव होतात. सोबतच माता लक्ष्मी पण प्रसन्न होते ज्याने घरात सुख- समृद्धी वाढते.
कोणते वस्तू आणायचं घरात
१. पिवळा वस्त्र किंवा सोनं: ज्योतिषी म्हणतात की रामनवमीपूर्वी पिवळे कपडे किंवा सोने खरेदी करून घरी आणल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि संपत्ती येते.
२. पिवळा शंख: रामनवमीच्या आधी, बाजारातून एक शंख खरेदी करा आणि तो तुमच्या पूजागृहात ठेवा. शंख खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. शंखाच्या नादाशिवाय अनेक देवी-देवतांची पूजा अपूर्ण मानली जाते, ज्यामध्ये भगवान हनुमानजींचाही समावेश आहे. म्हणून, रामनवमीपूर्वी घरात शंख ठेवा.
३. ध्वज: राम नवमीच्या आधी, भगवा किंवा पिवळा रंगाचा ध्वज खरेदी करा आणि तो घरी आणा आणि राम नवमीच्या दिवशी तो तुमच्या घरात फडकावा. हे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाहते. घरात नेहमीच सुख-समृद्धी वाढते आणि सर्व संकटे नष्ट होतात.
Ram Navami 2025: रामनवमी कधी आणि का साजरी केली जाते? जाणून घ्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व