माथेरानमध्ये श्रीराम नवमी उत्सवाचे ग्रामस्थ मंडळाकडून आयोजन…
रामनवमी हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे, जो देशभरात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यंदा हा सण रविवार, 6 एप्रिल रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
रामनवमी हा भगवान श्री राम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला होता. त्यामुळे दरवर्षी या दिवशी रामनवमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास ठेवतात, रामायणाचे पठण करतात आणि भजन आणि कीर्तनातून भगवान श्रीरामाची स्तुती करतात.
पंचांगानुसार, चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथी शनिवार, 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:26 वाजता सुरू होईल आणि रविवार, 6 एप्रिल रोजी 7:22 वाजता समाप्त होईल. अशा प्रकारे, रामनवमी रविवार, 6 एप्रिल साजरी केली जाईल.
ब्रह्म मुहूर्त: सकाळी 04:34 ते 05:20
विजय मुहूर्त: दुपारी 02:30 ते 03:20 पर्यंत
संध्याकाळ: 06:41 ते 07:03
निशीथ काळ: सकाळी 12:00 ते 12:46 पर्यंत
रामनवमी हा केवळ सण नसून तो सत्य, धर्म आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. भगवान श्री राम यांना ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणून ओळखले जाते, कारण त्यांनी त्यांच्या जीवनात सत्य आणि धर्माचे पालन केले. या दिवशी व्रत करून रामकथा श्रवण केल्याने नकारात्मकता संपून मनाला शांती मिळते. रामनवमीला विशेष पूजा आणि विधी केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते.
रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरा केले जाते. वाल्मिकी रामायणानुसार भगवान श्री रामाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला, कर्क लग्नात आणि अभिजात मुहूर्तावर झाला होता. रामनवमीचा चैत्र महिन्यातील
नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो, रामनवमी फक्त
भारताच नाही तर जगभरात साजरी केली जाते. रामनवमी हा वाईटावर विजयाचे प्रतीक आहे. भगवान रामाचे जीवन सत्य, कर्तव्य आणि अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे. त्यांना आदर्श पुत्र, राजा, पती आणि योद्धा मानलं जातं, जे निस्वार्थता आणि त्यागाचे प्रतीक आहेत. राम
नवमी एक धार्मिक उत्सव नसून भक्तीगीत आणि दानधर्माचा शुभ काळ आहे. या दिवशी गरजूंना अन्न, कपडे आवश्यक वस्तू दान करणे शुभ मानले जाते.
जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीही पूजा करता येते. पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या. यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा. त्यानंतर भगवान श्रीराम, लक्ष्मण, माता सीता, हनुमान यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित कराव्यात. मग चंदनाचा टिळा लावावा. त्यानंतर अक्षता, फूल अशी पूजेची सामग्री अपर्ण करावी. मग तुपाचा दिवा लावून रामरक्षा स्तोत्र, श्रीराम चालिसा आणि रामायणातील श्लोकांचे पठण करावे. तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदर कांडमधील पाठ आणि हनुमान चालिसा यांचे पठणही करू शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)