फोटो सौजन्य- pinterest
चाणक्यांनी सांगितलेल्या धोरणांचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये यश मिळते त्यासोबतच त्यांची प्रलंबित कामे देखील पूर्ण होतात. तसेच व्यक्तीला जीवनामध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतात. जर तुम्ही घर बांधण्याचा किंवा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चाणक्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींकडे आपण लक्ष दिले पाहिजे. कारण आपण घर बांधताना अनेक वेळा नकळत आपल्याकडून चुका होतात त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आर्थिक समस्या देखील उद्भवते. घर बांधताना कोणत्या चुका करु नयेत, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या
चाणक्य नीतीनुसार ज्या ठिकाणी कायद्याची भीती बाळगली जात नाही अशा ठिकाणी घर बांधू नका. नाहीतर निराशेला तोंड द्यावे लागू शकते. घर बांधताना किंवा खरेदी करताना अशा ठिकाणी करा जिथे कायदा आणि सुव्यवस्था योग्यरित्या पाळली जाते.
ज्या ठिकाणी पैसे कमाविण्याचे कोणतेही साधन नाही अशा ठिकाणी घर बांधू नका. अशा ठिकाणी घर बांधल्यास आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशा ठिकाणी घर बांधल्यास उत्पन्नाचे स्त्रोत सहज उपलब्ध होत नाही.
घर बांधताना अशी जागा शोधावी ज्या ठिकाणी द्याळू आणि दानशूर लोक वास्तव्यास असतील. या लोकांमध्ये त्याच प्रकारच्या भावना असतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. जे लोक दानधर्म करतात अशा ठिकाणी घर बांधणे चांगले मानले जाते. या गोष्टीचा तुमच्या जीवनावर आणि मुलांवर चांगला परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये अनेक फायदे होतात.
जे लोक प्रामाणिकपणे राहतात अशा ठिकाणी घर बांधणे चांगले मानले जाते. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, नैतिक मूल्ये जपणे, प्रामाणिक राहणे आणि सचोटीने जे व्यक्ती वागतात अशी लोक त्यांच्या कारकीर्दीमध्ये यशस्वी होतात. तसेच समाजामध्ये त्यांची चांगली प्रतिष्ठा तयार होते.
घर बांधताना शक्यतो घराजवळ रुग्णालय नसावे हे तपासून घ्यावे. कारण बऱ्याचदा घराच्या जवळपास रुग्णालय असते यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करु शकते. ज्याचा आपल्या मनावर परिणाम होतो. यामागे वैज्ञानिक कारण असल्याचे म्हटले जाते ते म्हणजे घराच्या जवळ रुग्णालय असल्यास बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्ग यापासून आपण प्रभावित होऊ शकतो. याचा सर्वांत जास्त परिणाम घरातील छोट्या मुलांवर होतो.
घर बांधताना किंवा खरेदी करताना जवळपास दारुचे दुकान नसल्याची खात्री करुन घ्यावी ते असल्यास घरामध्ये नकारात्मकता येऊ शकते. तसेच घरामध्ये भांडणे होणे यांसारख्या समस्या होऊ शकतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)