फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने आज सोमवार, 7 जुलै रोजी कर्क राशीतून आश्लेषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. बुधाचे हे संक्रमण सकाळी 5.55 वाजता झाले. आता आश्लेषा नक्षत्रामध्ये हा ग्रह 29 जुलै रोजी दुपारी 4.17 पर्यंत राहील त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4.17 पर्यंत कर्क राशीमध्ये राहील. दरम्यान शुक्रवार, 18 जुलै रोजी सकाळी कर्क राशीमध्ये असतेवेळी स्वामी बुध वक्री होईल त्यानंतर तो उलट दिशेने मागे सरकेल.
बुध ग्रहाचे होणारे हे संक्रमण खूप खास राहणार आहे. कारण तो स्वतः यावेळी नक्षत्रात संक्रमण करत आहे. ज्यावेळी बुध ग्रह स्वतःच्या राशीमध्ये किंवा नक्षत्रामध्ये संक्रमण करतो त्यावेळी त्याच्यामधील ऊर्जा वाढून तो अधिक मजबूत होतो. अशा वेळी बुध ग्रहाचा काही राशीच्या लोकांवर जास्त प्रभाव पडताना दिसून येतो. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला वाणी, बुद्धिमत्ता, संवाद, व्यवसायाचा कारक मानला जातो. बुध ग्रह हा आश्लेषा नक्षत्राचा स्वामी देखील आहे. बुध ग्रहाच्या या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागेल, जाणून घ्या
बुध ग्रहाने कर्क राशीमध्ये संक्रमण केल्याने या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. जे मूल अभ्यासामध्ये रस घेत नाही ते मूल आता एकाग्रतेने अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. जर तुमचे तुमच्या भावंडासोबत भांडणे किंवा मतभेद झाली असल्यास ते दूर होतील. ज्यांना आरोग्याच्या समस्या होत असतील त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. जर कोणत्याही योजनेत तुम्ही मोठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
बुध ग्रहाच्या हालचालीचा परिणाम वृश्चिक राशींच्या लोकांवर होताना दिसून येईल. या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो तसेच या लोकांवर असलेले कर्ज दूर होऊ शकते. तुमची एखाद्या अनोळखी व्यक्तीची ओळख होईल त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. जे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांना त्या स्पर्धेमध्ये अपेक्षित यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी.
बुध ग्रहाच्या हालचालीचा परिणाम कुंभ राशीच्या लोकांवर सकारात्मक होईल. ज्या लोकांना पायाला दुखापत झाली आहे ती बरी होईल किंवा आरोग्याच्या काही समस्या असल्यास त्या दूर होतील. जर तुमच्याकडून एखाद्याने पैसे उधार घेतले असतील तर ते परत मिळतील. जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फायदा होईल. जे लोक नोकरीच्या शोधात आहे त्यांना यश मिळेल. व्यावसायिकांना हुशारीने केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होईल त्यामुळे तुमच्यावरील आर्थिक संकट दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)