Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chanakya Niti: निर्णय घेताना कोणती काळजी घ्यावी, काय सांगते चाणक्य नीती

चाणक्यानुसार, निर्णय घेताना धैर्य बाळगणे आवश्यक आहे. कारण भीती आणि संकोच माणसाला मागे ठेवतात. योग्य वेळी धाडसी निर्णय घेणे ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे. निर्णय घेताना कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 06, 2025 | 03:48 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

चाणक्याच्या मतांनुसार, आजही लोकांना त्यांचे जीवन जगण्यासाठी योग्य दिशा देते. जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त ज्ञान किंवा संधी पुरेसे नसते तर सर्वांत महत्त्वाचे असते ते म्हणजे निर्णय घेण्याचे धाडस. जर तुम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ शकत नसाल तर आयुष्यातील अनेक संधी तुमच्या हातून निसटू शकतात. चाणक्याच्या म्हणण्यानुसार, नशीबसुद्धा ज्यांना त्रास देते जे स्वतःला मदत करतात. याचा अर्थ असा की, जर तुम्ही स्वतःसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही तर दुसरे कोणीही तुमच्यासाठी काहीही करणार नाही. निर्णय घेताना कधीही घाबरु नये, उलट धैर्याने निर्णय घ्यावे. कोणताही निर्णय न घेण्यापेक्षा निर्णय घेणे चांगले. कारण जेव्हा तुम्ही मार्ग निवडता तेव्हाच तुमची पावले पुढे जातात. निर्णय घेताना कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या

भीती

बऱ्याचदा लोक कोणताही निर्णय घेताना घाबरतात.  कारण त्यांच्या मनात भीती असते की, जर आपला निर्णय चुकीचा ठरला तर लोक काय म्हणतील. आपल्या चुकीच्या निर्णयामुळे  नुकसान झाले तर? पण ही भीती आणि शंका माणसाची सर्वात मोठी कमजोरी बनू शकते. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, संकोच आणि भीती माणसाला कधीही पुढे जाऊ देत नाहीत. जर तुम्ही या दोन्ही गोष्टींवर मात करू शकत नसाल तर तुम्ही जीवनात कधीही मोठे यश मिळवू शकणार नाही.

Vinayaka Chaturthi: विनायक चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय, कर्जातून होईल सुटका

अऩुभावामधून शिकणे

प्रत्येक निर्णय हे बरोबरच असतात असे होत  नाही पण प्रत्येक निर्णय तुम्हाला काहीतरी शिकवून जातात. तुम्ही कधी चुकीचा निर्णय घेतला तरी त्यातून मिळणारा  अनुभव तुम्हाला तुमच्या पुढच्या निर्णयात अधिक मजबूत बनवतो. चाणक्यांच्या मते, चूक करणे चुकीचे नाही पण चुकीतून न शिकणे हे चुकीचे आहे म्हणून निर्णय घेण्यास उशीर करु नका. वेळेवर धैर्याने काम करा आणि जे योग्य वाटेल ते करा.

योग्य वेळी निर्णय घेणे

राजकारण आणि मुत्सद्देगिरीत चाणक्य यांनी मिळवलेले यश केवळ कठीण परिस्थितीतही धाडसी निर्णय घेतल्यामुळेच शक्य झाले. चंद्रगुप्ताला गादीवर बसवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने अनेक मोठी पावले उचलली आणि प्रत्येक वेळी धाडस दाखवले. विचार करत राहून निर्णय घेतल्यास इतिहास वेगळा असता.

Vastu Tips: घरात चावी ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती?

नशिबावर रडू नका

बऱ्याचदा लोक आपल्या नशिबावर रडत बसतात. हे माझ्यासोबत असे का घडले? मला संधी का मिळाली नाही?  या गोष्टींचा विचार करत बसतात. परंतु चाणक्याच्या मतांनुसार नशीब फक्त धाडसी लोकांना साथ देते. जर तुम्ही प्रयत्न करुन निर्णय घेऊन धैर्याने पुढे गेल्यास तुम्हालाही नशिबाची साथ लाभेल. जे फक्त विचार करत राहतात, त्यांना नशिबाची साथदेखील मिळत नाही.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Chanakya niti what to consider when making a decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • Chanakya Niti
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस
1

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने-चांदीच नाही तर या वस्तूंची करा खरेदी, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ
2

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने-चांदीच नाही तर या वस्तूंची करा खरेदी, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

Kendra Yog: 7 ऑक्टोबरला बुध आणि यम यांच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल समृद्धी आणि यश
3

Kendra Yog: 7 ऑक्टोबरला बुध आणि यम यांच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल समृद्धी आणि यश

Baba Vanga: बाबा वेंगाने पुढील 3 महिन्यासाठी केली मोठी भविष्यवाणी, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा
4

Baba Vanga: बाबा वेंगाने पुढील 3 महिन्यासाठी केली मोठी भविष्यवाणी, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.