फोटो सौजन्य- pinterest
पंचांगानुसार, आज शुक्रवार, 10 ऑक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थी आहे. हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा केला जातो. या दिवशी भक्तिभावाने गणपती बाप्पाची पूजा केली जाते तर भक्त या दिवशी उपवास देखील करतात. हा उपवास केल्याने भक्तावर गणपती बाप्पाचे अनंत आशीर्वाद प्राप्त होतात, अशी मान्यता आहे. त्यांच्या कृपेने जीवनात सर्व प्रकारचे भौतिक सुख मिळते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे संक्रमण खूप महत्त्वाचे मानले जाते. कारण चंद्र आपल्या मनावर, भावनांवर आणि दैनंदिन उर्जेवर नियंत्रण ठेवतो. चंद्र मेष राशीमध्ये अडीच दिवस राहणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रवार, 10 ऑक्टोबर रोजी चंद्र आपली राशी बदलणार आहे. या दिवशी चंद्र मेष राशीपासून वृषभ राशीत आपले संक्रमण करणार आहे. चंद्राच्या राशी परिवर्तनामुळे अनेक राशींच्या जीवनात आनंद येणार आहे. संकष्टी चतुर्थी आणि चंद्राच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र शुक्रवार, 10 ऑक्टोबर रोजी पहाटे 1.22 वाजता मेष राशीतून वृषभ राशीमध्ये संक्रमण करेल. तो 12 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपर्यंत या राशीत राहणार आहे. त्यानंतर तो मिथुन राशीमध्ये संक्रमण करणार आहे.
चंद्राचे वृषभ राशीत होणारे संक्रमण मेष राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतात. या काळात तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. तसेच आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. व्यवसायामध्ये अपेक्षित वाढ होऊ शकते. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे. या काळात गुंतवणूक करताना काळजी घ्या. या काळात करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षित संधी मिळतील. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
कर्क राशीवर चंद्राचे राज्य आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी महादेवाची पूजा करावी. यामुळे चंद्र देव प्रसन्न होईल. तसेच भक्ताला आशीर्वाद मिळतो. चंद्राच्या कृपेने तुम्ही मानसिक ताणतणावातून मुक्त व्हाल. गुंतवणूक योजना आखता येतील. या काळात तुम्ही खरेदी करु शकता. तसेच धार्मिक ठिकाणाला भेट देखील देऊ शकता. सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल. व्यवसायाशी संबंधित समस्या सोडवल्या जातील. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या काळात अपेक्षित यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)