फोटो सौजन्य- istock
शनिदेवाला कर्माचे फळ देणारा म्हणून ओळखले जाते. तो व्यक्तींना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो, असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला एक महत्त्वाचा ग्रह मानले जाते. शनि हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. तो दर अडीच वर्षांनी राशी बदलतो. ज्योतिषशास्त्रात शनिच्या राशीत होत असलेले बदल ही एक महत्त्वाची घटना मानली जाते. शनि मीन राशीत वक्री होत असल्याने तो वक्री गतीने संक्रमण करेल. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधीतरी शनिच्या साडेसाती, धैय्या आणि महादशा किंवा शनिदोषाचा सामना करावा लागू शकतो.
ज्यावेळी शनि इतर ग्रहांची युती करतो त्यावेळी विशेष योग तयार होतात. अशावेळी करवा चौथनंतर म्हणजेच तो 11 ऑक्टोबर रोजी शनि शुक्राशी युती होऊन प्रतियुती योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवार 11 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4.38 वाजता शनि आणि शुक्र 180 अंशांच्या अंतरावर असताना हा प्रतियुती योग तयार होईल. शनि आणि शुक्र समोरासमोर आल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकतो. हा योग काही राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. प्रतियुती योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या
कन्या राशीच्या शनि-शुक्र युती या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमची दीर्घकालीन प्रलंबित कामे पूर्ण होतील. तसेच खूप मेहनत घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश देखील मिळेल. त्यासोबतच या काळात तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
मकर राशीच्या लोकांसाठी शनि-शुक्र युती खूप शुभ राहील. या काळात त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. तसेच तुम्हाला करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे तुमच्या पदोन्नतीमध्ये वाढ होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना देखील अपेक्षित यश मिळू शकते. त्यासोबतच तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. या योगाच्या प्रभावामुळे दीर्घकालीन समस्यांवर तोडगा निघण्याचे संकेत आहेत.
मीन राशीच्या लोकांसाठी शनि-शुक्राची युती खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच आदर देखील वाढेल. तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि क्षमतेचे कौतुक देखील होईल. या काळात नोकरी आणि व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)