फोटो सौजन्य- pinterest
दिवाळीच्या पवित्र सणाची सुरुवात लवकरच होत आहे. यावेळी लोक घरांची स्वच्छता, रंगरंगोटी आणि सजावट करण्याची तयारी सुरू करतात. जर तुम्हीही यावेळी तुमचे घर रंगवण्याचा विचार करत असाल तर वास्तू आणि फेंगशुईच्या नियमांनुसार रंग निवडल्यास ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहणार आहे. योग्य दिशा आणि वातावरणानुसार निवडलेले रंग फक्त भिंतींचे सौंदर्य वाढवतातच असे नाही तर घरात सकारात्मकता देखील आणतात.
घरामधील लिविंग रूम ही एक महत्त्वाची जागा मानली जाते. कारण पाहुणे आले की या ठिकाणी बसतात. त्यामुळे या खोलीच्या भिंतीसाठी पांढरा, क्रीम, हलका तपकिरी किंवा गुलाबी रंग वापरणे खूप शुभ मानले जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या रंगांच्या पडद्याचा देखील वापर करु शकता.
स्वयंपाकघर हे कौटुंबिक उर्जेचे केंद्र मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी पांढरा रंग देणे उत्तम मानले जाते. जरी हा रंग लवकर खराब होत असला तरी नियमित साफसफाई केल्याने स्वयंपाकघरात स्वच्छता आणि सकारात्मकता टिकून राहते. पांढऱ्या रंगाचा वापर केल्याने घरामध्ये संपत्ती आणि आरोग्य दोन्ही राखण्यास मदत होते.
बेडरूम ही आराम करण्यासाठी एक उत्तम जागा मानली जाते. म्हणून या ठिकाणी हलके आणि सुखदायक रंगांची निवड करणे चांगले मानले जाते. आकाशी निळा, हलका हिरवा, गुलाबी आणि क्रीम रंग या रंगांचा खोलीमध्ये वापर केल्याने केवळ शांतता निर्माण होत नाही तर सकारात्मक ऊर्जा देखील वाढते. हे रंग वैवाहिक जीवनात सुसंवाद आणि आनंद राखण्यास मदत करतात.
पांढरा आणि गुलाबी रंग बाथरूमसाठी चांगला मानला जातो. विशेषतः गुलाबी रंग सकारात्मकता आणतो आणि आरोग्याच्या समस्या कमी करण्यास मदत करतो असे मानले जाते. हे रंग बाथरूममध्ये हलकेपणा आणि ताजेपणाची भावना निर्माण करतात.
गडद किंवा काळा रंगाचा वापर करणे टाळावे, कारण ते प्रकाश आणि सकारात्मकता दोन्ही कमी करू शकतात.
रंगवण्यापूर्वी ओलसर भागांची दुरुस्ती नक्की करा.
पर्यावरणपूरक आणि तुमच्या आरोग्यासाठी सुरक्षित रंग निवडा.
दिवाळीच्या 10 ते 12 दिवस आधी रंगकाम पूर्ण करा, जेणेकरून घरातील धूळ आणि वास पूर्णपणे निघून जाईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)