फोटो सौजन्य- pinterest
आज सोमवार 30 जून रोजी चंद्र देव सिंह राशीमध्ये असताना पूर्वफाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. त्याआधी त्यांनी 29 जून रोजी सिंह राशीमध्ये प्रवेश केला होता आता या नक्षत्रामध्ये ते उद्या मंगळवार 1 जुलैपर्यंत असणार आहे. चंद्राने हे संक्रमण आज सकाळी 7.20 वाजता केले आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्र देवाला मानसिक स्थिती, मन, आई, आनंद आणि निसर्गाचा कर्ता मानले जाते. तर 27 नक्षत्रांपैकी पूर्वफाल्गुनी नक्षत्रामध्ये यांचे स्थान 11 वे आहे. या नक्षत्राचा स्वामी शुक्र देव आहे. यावेळी पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात सिंह राशीत येत असल्याने त्याचा स्वामी सूर्य आहे. चंद्राच्या सिंह नक्षत्रात संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या.
चंद्राचे हे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणणारा राहील. घरगुती जीवनामध्ये सुरु असलेल्या समस्या संपतील, तसेच नातेसंबंधामध्ये सकारात्मक ऊर्जा राहील. तरुणांना कठोर मेहनत घेऊन त्यांच्या कारकिर्दीमध्ये उच्च पदे मिळतील. नोकरी करणारे लोक वरिष्ठांची समन्वय साधतील. या लोकांची समाजामध्ये प्रतिष्ठा वाढलेली असेल. व्यापारी लोक नवीन मालमत्ता खरेदी करु शकतात.
धनु राशीच्या लोकांच्या नातेसंबंधामध्ये कायम गोडवा राहील. दुकानदार नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तसेच तुम्ही नवीन मालमत्तेची खरेदी देखील करु शकता. या लोकांना आर्थिक संकटांचा सामना कमी करावा लागेल. व्यावसायिक लोकांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल. तसेच तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तुमचा धार्मिक कार्यात रस वाढेल.
सिंह राशीमधून केलेले संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. वर्षानुवर्षे प्रलंबित कामे सुरु होण्यास वेग येईल. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची करिअरमध्ये पदोन्नती होऊ शकते. तुम्हाला सुख समृद्धी लाभेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमची पद प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता.
मीन राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळेल. आरोग्य चांगले राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या दीर्घकालीन योजनेमध्ये गुंतवणूक करु शकता त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. जर कोणालाही एखाद्या गोष्टीबद्दल तणाव असल्यास तो दूर होईल. जीवनात येणाऱ्या अडचणी हळूहळू कमी होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)