फोटो सौजन्य- pinterest
आज सोमवार, 30 जून रोजी चंद्र सिंह राशीमध्ये आहे. चंद्राचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. चंद्र मंगळासोबत सिंह राशीत धन लक्ष्मी योग तयार करेल. तर शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये असून तो राजयोग तयार करेल. आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी मंगळ पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात आपले संक्रमण करेल. तसेच माघ आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या युतीमुळे सिद्धी योग देखील तयार होणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप फायदेशीर राहणार आहे. काही राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो तर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. सोमवारचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. शिक्षण क्षेत्रात या लोकांना चांगले यश मिळेल. या लोकांची निर्णय घेण्याची क्षमता मजबूत असेल. शेअर बाजार, मनोरंजन, शिक्षण, डिजिटल मीडिया, लेखन, जाहिरात, डिझायनिंग इत्यादींशी संबंधित लोकांना लाभ होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. या लोकांवरील मानसिक ताण कमी होईल. मालमत्तेमधून तुम्हाला फायदा होईल. तुम्ही नवीन वाहनांची खरेदी देखील करु शकता. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या वर जबाबदाऱ्या येऊ शकतात. तसेच तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचा देखील पाठिंबा मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील. तुम्हाला करिअर आणि व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल. व्यवसायात जी कामे प्रलंबित राहिली असतील ती पूर्ण होतील. अन्न, स्वयंपाकघर, दुग्धजन्य पदार्थ, पाणी उत्पादने, घरगुती वस्तू, चांदी, व्यवसाय, शिक्षण इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना फायदा होईल. तुमचे जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील.
तूळ राशीच्या लोकांना आज नशिबाची पूर्ण साथ लाभेल. आज या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायामध्ये तुमची प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण होतील. कोणाला उधारीवर पैसे दिले असल्यास तुम्हाला ते परत मिळतील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. व्यवसायामध्ये स्थिरता राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
मकर राशीच्या लोकांना अपेक्षेपक्षा जास्त फायदा होईल. व्यवसायामध्ये फायदा होईल. कामाच्या ठिकाणी कठोर मेहनत घ्यावी लागेल. कठीण परिस्थितीला धैर्याने तोंड द्याल. या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. परिवारामध्ये आनंदी वातावरण राहील. तुमच्या नात्यांमध्ये मतभेद असतील तर ते दूर होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)