फोटो सौजन्य- pinterest
सोमवार सात जुलै रोजी चंद्र वृश्चिक राशीमध्ये संक्रमण करेल. आज चंद्र आणि शुक्र यांच्यामध्ये समसप्तक योग तयार होईल. बुद्ध आश्लेषा नक्षत्रामध्ये प्रवेश करेल आणि चंद्राच्या सप्तम योगामुळे चंद्राची योग तयार होईल. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस सर्व राशींसाठी खूप खास असणार आहे. चंद्राधी योग आणि भगवान शंकराच्या आशीर्वादाने कन्या राशीसह इतर राशींच्या लोकांना फायदा होणार आहेत. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या.
वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. जर तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये भागीदारांमध्ये काम करत असाल तर तुमचा आजचा दिवस अनुकूल असेल. व्यवसायातील नाते मजबूत राहील. जोडीदारासोबतचे नाते चांगले राहील. तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या यश मिळेल.
सिंह राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आशादाई राहील. तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला राहील. कोणत्याही कामाची सुरुवात करताना वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. तुमच्या आर्थिक स्थिती चांगली राहील. तर तुम्हाला आर्थिक परिस्थितीशी सामना करत असाल तर तुमची यातूनच सुटका होईल.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कोणतेही धाडसी निर्णय घ्यावे लागू शकतात. तुमच्या अनपेक्षित योजनेमुळे तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. मीडिया, अध्यापन, प्रशिक्षण, विपणन इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अतिरिक्त फायदे मिळू शकतात. व्यवसायात असणारे लोक कामानिमित्त प्रवास करु शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. करिअरपासून ते व्यवसायापर्यंत क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांना चांगला फायदा होईल. ज्या योजनेत तुम्ही पैसे गुंतवले असाल त्याचा तुम्हाला फायदा होईल. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. जे नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्याचा फायदा होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास राहील. कामाच्या ठिकाणी तुमची कामे गांभीर्याने पूर्ण होईल. तुमच्या कामात अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते. सरकारी निविदा मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते. सामाजिक वर्तुळ देखील विस्तारेल. राजकारण आणि समाजसेवेशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)