फोटो सौजन्य- istock
आज सोमवार, 7 जुलै. अंकशास्त्रानुसार, केतू हा 7 क्रमांकाचा स्वामी ग्रह आहे. याचा प्रभाव सर्व मूलांकांच्या लोकांवर होताना दिसून येईल. चंद्राची संख्या 2 मानली जात असल्याने मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहणार आहे. तसेच या लोकांचा मानसिक ताण देखील कमी होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांवर कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या जबाबदारी असतील. तुम्हाला नेतृत्वाची भूमिका पार पाडावी लागेल. या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांचा समाजामध्ये तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज तुमच्यामध्ये संवेदनशीलता जाणवेल. तुमचा मानसिक ताण कमी होईल. तुम्ही कामामध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करु शकता. कला, लेखन, संगीत यासारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते.
मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. ज्यामुळे तुम्हाला जीवनात नवीन दिशा मिळेल. शिक्षण, अध्यापन, प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांची प्रतिमा मजबूत असेल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना यश मिळेल.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांना कामावर आपले लक्ष केंद्रित करावे लागेल. जर तुमच्या काही योजना अपेक्षेपेक्षा कमी वेगाने पुढे जात असतील, तर त्यांना आता पुन्हा गती मिळू शकते. तंत्रज्ञान, आयटी, बांधकाम किंवा अकाउंटिंगशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज फायदा होऊ शकतो.ट
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यावसायिकांना नवीन संपर्कांचा फायदा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही क्षेत्रात पैसे गुंतवले असल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल. चुकीचे निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. हे लोक आज कुटुंबासोबत वेळ घालवतील. तसेच, सौंदर्याशी संबंधित कामांमध्ये तुमची आवड वाढू शकते. फॅशन, सजावट किंवा कार्यक्रमांशी संबंधित असलेल्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी कौतुकाची थाप मिळू शकते.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. हे लोक एखाद्या विषयावर खोलवर चर्चा करु शकतात. मानसिक शांतीसाठी, ध्यान, योग किंवा आत्मनिरीक्षणासाठी वेळ काढणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी येऊ शकते.
मूलांक 8 असलेल्या लोकांनी कामाच्या ठिकाणी शिस्त बाळगावी. व्यवसाय करणाऱ्यांसाठी दीर्घकालीन करार किंवा प्रकल्प आज सुरू होऊ शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी कठोर मेहनत घ्यावी लागेल. आज आर्थिक बाबतीत संयम आणि शांततेने निर्णय घ्यावे लागतील, अन्यथा नुकसान होऊ शकते.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरेलला राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन आव्हांनाना सामोरे जावे लागेल. तुमच्यामध्ये नेतृत्वाची भावना देखील मजबूत असेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)