Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dev Uthani Ekadashi: देवूठाणी एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

कार्तिक महिन्यामध्ये देवूठाणी एकादशी आहे. यावेळी भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात. यावर्षी एकादशीच्या दिवशी भद्रा आणि पंचक दोन्ही योग आहेत. जाणून घ्या देवूठाणी एकादशी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 16, 2025 | 03:38 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

देवूठाणी एकादशी कार्तिक महिन्याच्या अकराव्या दिवशी साजरी केली जाते. या एकादशीला देवुत्थान एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी या नावाने देखील ओळखले जाते. देवुथनी एकादशीला रवि योग तयार होत आहे आणि दिवसभर पंचक देखील असणार आहे. तर रात्री भद्रा असेल. देवुथनी एकादशी ही चातुर्मासाची समाप्ती दर्शवते, कारण या दिवशी देवता जागृत होतात. ज्योतिषशास्त्रानुसार देवुथनी एकादशीला भगवान विष्णू योगिक निद्रेमधून बाहेर येतात. या दिवशी उपवास, पूजा आणि दान केल्याने पापांचे शुद्धीकरण होते आणि विष्णूच्या कृपेने मोक्ष मिळतो, अशी मान्यता आहे. कार्तिक महिन्यातील देवूठाणी एकादशी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

देवूठाणी एकादशीची काय आहे तारीख

पंचांगानुसार, कार्तिक शुक्ल एकादशी तिथी शनिवार, 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.11 वाजता सुरू होते. ही तिथी रविवार, 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.31 वाजता संपेल. यावर्षी देवूठाणी एकादशी दोन दिवस साजरी केली जात आहे. घरातील लोक 1 नोव्हेंबर रोजी उपवास करतील, तर वैष्णव 2 नोव्हेंबर रोजी उपवास करतील.

Dhanteras Shubh Yog: धनत्रयोदशीला तयार होत आहे दुर्मिळ योग, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

रवियोगामध्ये देवूठाणी एकादशी

देवूठाणी एकादशीला रवि योग तयार होत आहे. रवि योग सकाळी 6.33 वाजता सुरू होणार आहे आणि उपवासाच्या संध्याकाळी 6.20 वाजेपर्यंत हा योग राहणार आहे. ध्रुव योग सकाळी सुरू होईल आणि 2 नोव्हेंबर रोजी पहाटे 2.10 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर, व्याघ्र योग तयार होणार आहे. एकादशीला शताभिषा नक्षत्र पहाटेपासून संध्याकाळी 6.20 पर्यंत असते, त्यानंतर पूर्वा भाद्रपद नक्षत्र प्रभावी असते.

देवूठाणी एकादशी शुभ मुहूर्त

एकादशीच्या दिवशी व्रत करणाऱ्या लोकांनी सकाळी ब्रम्ह मुहूर्त 4.50 ते 5.41 राहील यावेळी उठून आवरुन झाल्यानंतर उपवासाची प्रतिज्ञा घ्यावी आणि विष्णूची पूजा करावी. त्यानंतर सकाळी 7.56 ते 9.19 या शुभ मुहूर्तावर आणि रवियोगात योग्य विधींनी भगवान विष्णूची पूजा करा. देवूठाणी एकादशी किंवा अभिजित मुहूर्ताचा शुभ मुहूर्त सकाळी 11.42 ते दुपारी 12.27 पर्यंत आहे.

देवूठाणी एकादशीला पंचक आणि भद्रा

देवूठाणी एकादशीला पंचक दिवसभर असणार आहे. तर भद्रा रात्री 8.27 वाजता सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी, 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.34 पर्यंत राहील. भद्रा दरम्यान शुभ कार्य करण्यास मनाई आहे.

Surya Gochar: सूर्य तूळ राशीमध्ये करणार संक्रमण, मिथुन राशीसह या राशीच्या लोकांना होणार सकारात्मक परिणाम

एकादशीला पारण करण्याचा वेळ

देवूठाणी एकादशीच्या दिवशी पारण म्हणजे उपवास सोडण्याचा वेळ दुसऱ्या दिवशी आहे. घरातील लोक 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.11 ते 3.23 या वेळेत कधीही देवूठाणी एकादशीचा उपवास सोडू शकतात. त्या दिवशी दुपारी 12.55 वाजता हा उपवास संपेल.

देवूठाणी एकादशीचे महत्त्व

देवूठाणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेमधून बाहेर येतात, त्यांच्यासोबत असलेले सर्व देव जागृत अवस्थेत असतात. देवूठाणी एकादशीला चातुर्मास संपतो. देवूठाणी एकादशीनंतर लग्न, गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्यक्रमांसाठी शुभ मुहूर्त उपलब्ध होतात. शुभ कार्यांवरील बंदी उठवली जाते. तसेच भगवान विष्णू भगवान शिवाकडून विश्वाचे व्यवस्थापन घेतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Dev uthani ekadashi 2025 date shubh muhurat yoga importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Varaha Jayanti 2026: कधी आहे वराह जयंती, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
1

Varaha Jayanti 2026: कधी आहे वराह जयंती, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Career Horoscope: वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे फळ मिळणार; सप्टेंबरमध्ये या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळू शकते मोठी संधी
2

Career Horoscope: वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे फळ मिळणार; सप्टेंबरमध्ये या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळू शकते मोठी संधी

Mangal Gochar: नीच मंगळाचा प्रभाव या राशींवर पडणार भारी, नोकरी-व्यवसायासह नात्यांमध्ये वाढणार तणाव
3

Mangal Gochar: नीच मंगळाचा प्रभाव या राशींवर पडणार भारी, नोकरी-व्यवसायासह नात्यांमध्ये वाढणार तणाव

Palmistry: वारंवार आजारी पडता? हातावरील ‘ही’ रेषा सांगते तुमच्या आरोग्याचे गुपित
4

Palmistry: वारंवार आजारी पडता? हातावरील ‘ही’ रेषा सांगते तुमच्या आरोग्याचे गुपित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.