फोटो सौजन्य- pinterest
दिवाळीचा सण फक्त प्रकाश आणि गोडवा यासाठी नसून प्रत्येक दिवस एका विशेष महत्त्वाने साजरा केला जातो. दिवाळीच्या सणांची सुरुवात धनत्रयोदशीच्या सणाने होते. यावेळी धनत्रयोदशी शनिवार, 18 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी लोक नवीन वस्तूंची खरेदी करतात, भगवान धन्वंतरीची पूजा करतात आणि भविष्यात सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. हा सण धनत्रयोदशी पुरता मर्यादित नसून या दिवशी एक अतिशय खास योग देखील तयार होत आहे. धनत्रयोदशीला ब्रम्ह आणि बुधादित्य योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार, जाणून घ्या
धनत्रयोदशीला ब्रह्मयोग आणि बुधादित्य योग हे दोन शुभ योग एकत्र येत असल्याने हा दिवस आणखी खास बनतो. ज्योतिषशास्त्रानुसार, हे योग संपत्ती आणि भाग्याशी संबंधित अडथळे दूर करू शकतात. तूळ, कर्क आणि मकर राशींच्या लोकांसाठी या काळामध्ये नवीन आर्थिक शक्यता आणि जीवनात प्रगतीची शक्यता निर्माण करतो.
धनत्रयोदशी हा सण नेहमीच संपत्ती, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. यावर्षी धनत्रयोदशी शनिवारी येत आहे त्यामुळे शनिदेवाचे विशेष आशीर्वाद काही राशीच्या लोकांवर असतील. ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीत बुध आणि सूर्याच्या युतीमुळे निर्माण होणारा बुद्धादित्य योग विशेष महत्त्वाचा आहे आणि तो अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.
ब्रह्म योग आणि बुद्धादित्य योगाचे हे संयोजन सर्व राशींना कोणत्या ना कोणत्या प्रकारे फायदेशीर ठरणार आहे. हे होणारे संयोजन खूप फायदेशीर असणार आहे. ज्याचा फायदा करिअर, संपत्ती आणि प्रतिष्ठा यासाठी होणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. या काळात तुम्ही नवीन सुरुवात देखील करु शकतात. व्यवसायात वाढ होईल आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात.
कर्क राशीच्या लोकांना धनत्रयोदशीचा काळ खूप शुभ असणार आहे. या काळात तुमच्या जीवनात सुखसोयी आणि विलासिता वाढतील आणि मालमत्तेशी संबंधित लाभाची शक्यता बळकट होईल. नवीन नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी तयार होतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती अनुकूल राहील.
धनत्रयोदशीला तयार होणारा बुधादित्य योग तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. या काळात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल, ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल येतील. विशेषतः अविवाहितांना, लग्नाचे किंवा नात्याचे चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, करिअरमध्ये प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याच्या स्पष्ट संधी आहेत.
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ आणि फायदेशीर ठरणार आहे. बुधादित्य योगामुळे बेरोजगार तरुणांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. याशिवाय नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. त्यामुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तसेच तुम्हाला या काळात मानसिक समाधान मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)