
फोटो सौजन्य- pinterest
गुरुवार, 6 नोव्हेंबरचा दिवस. आज चंद्र मेष राशीमधून वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यासोबतच आज शशी योग तयार होईल. चंद्रावर मंगळाची सप्तमी भूमिका असल्याने धन योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ, बुध आणि सूर्य आणि शुक्र यांच्या युतीमुळे द्विग्रह योग तयार होईल. कृतिका नक्षत्रामुळे सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होणार आहे. मेष, वृषभ, सिंह, वृश्चिक आणि धनु राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. आज गुरुवारी कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या काळात तुम्हाला नशिबाची अपेक्षित साथ मिळेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकारी आणि मित्रांकडून पाठिंबा मिळेल. व्यावसायिकांना पैसे कमविण्याची चांगली संधी मिळेल. कुटुंबामध्ये असलेले मतभेद दूर होतील. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपेक्षित यश मिळेल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददाचा राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला प्रोत्साहन मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी बदलण्याच्या शोधात असलेल्यांना फायदेशीर संधी मिळू शकते. वैवाहिक जीवन चांगले राहील. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला फायदा होईल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले महत्त्वाचे काम आज पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला मित्र किंवा शेजाऱ्याकडूनही पाठिंबा मिळू शकेल. तुम्हाला तुमच्या मागील व्यवसायातील गुंतवणुकीचे फायदे मिळतील आणि एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. न्यायालयीन आणि सरकारी बाबींमध्येही तुम्ही भाग्यवान असाल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला अनेक स्रोतांकडून पैसे मिळू शकतील. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळू शकतील. तुमच्या व्यवसाय विस्ताराच्या योजनांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मालमत्तेच्या व्यवहारामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकतात.
धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. तुम्हाला एखादी महत्त्वाची जबाबदारी देखील मिळू शकते, जी तुम्हाला आनंद देईल. व्यवसायासाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला फायदेशीर व्यवसाय करार मिळाल्याने आनंद होईल. तुम्ही घेतलेला कोणताही व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. कुटुंबासह सहलीची योजना देखील आखू शकता. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती आणि मालमत्तेचा फायदा होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)