फोटो सौजन्य- pinterest
आजचा गुरुवारचा दिवस खास असणार आहे. अंक 6 चा स्वामी ग्रह शुक्र आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव राहील. गुरुवारच्या दिवसाचे स्वामी ग्रह गुरू आहे. ज्याला नशीब, शिक्षण, बुद्धी इत्यादींचे कारक आहे. तर शुक्र ग्रह सन्मान, नोकरी आणि व्यवसायाचे कारक आहे. गुरू आणि शुक्राच्या युतीमुळे काही मुलांकांच्या लोकांना धन, नशीब आणि ज्ञान याचे कारक मानले जाते. आज मूलांक 3 असलेल्या लोकांचा दिवस उत्साहाचा राहील आणि मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या
मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाची काम मध्ये अडकू शकतात. अशा वेळी तुम्हाला धैर्य बाळगावे लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी. मानसिक तणाव वाढू शकतो. विद्यार्थ्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही चिंतेत राहाल. कामाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढू शकता. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल.
मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहील. शिक्षण क्षेत्रात प्रगती होईल. आज तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. घाईमध्ये कोणतेही काम करू नका. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्हाला फायदा होईल. आर्थिक बाबतीत देवाणघेवाण करताना सावध रहा.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी काम चांगल्या प्रकारे करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. एखाद्या गोष्टीवरून तुम्ही खूप विचार करू शकता. रागावर नियंत्रण ठेवा.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्साहाचा राहील. तुमची महत्त्वाची कामे वेळेवर होतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. काही ठिकाणी तुमचा उत्साह कमी होईल. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 7 असणाऱ्या लोकांनी सावध रहावे. कामाच्या ठिकाणी लक्ष देऊन काम करणे गरजेचे आहे अन्यथा समस्या येऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि वाद घालणे टाळा. जोडीदारासोबत वाद घालणे टाळा.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहणार आहे. तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला मिळू शकतात. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. विचारपूर्वक खर्च करावे नाहीतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमची एखाद्या खास व्यक्तीसोबत ओळख होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही काम अचानक मिळू शकतात. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. सरकारी कामामध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सावध रहा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






