Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhanu Sankranti: सूर्य संक्रांती कधी आहे? सूर्य संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा

2025 च्या शेवटच्या सूर्य संक्रांतीमुळे सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य संक्रमणाचा शुभ अशुभ प्रभाव विविध राशीच्या लोकांवर पडताना दिसून येतो. यावेळी सूर्य संक्रमणाचा कोणत्या राशींना फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 10, 2025 | 03:48 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • धनु संक्रांती म्हणजे काय
  • सूर्याचे संक्रमण कधी होणार आहे
  • सूर्याच्या संक्रमणाचा कोणाला फायदा होणार
 

2025 मधील वर्षातील शेवटची संक्रांती धनु संक्रांती आहे, जी मंगळवार, 16 डिसेंबर रोजी येते. पंचांगानुसार, सूर्याचा धनु राशीत प्रवेश किंवा संक्रांतीचा मुहूर्त या दिवशी पहाटे 4.27 वाजता आहे. अशाप्रकारे, 16 डिसेंबर रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करणार आहे. राशींमध्ये सूर्याच्या संक्रमणाला ‘संक्रांती’ म्हणतात आणि जेव्हा सूर्य वृश्चिक राशीतून धनु राशीत संक्रमण करतो तेव्हा त्याला धनु संक्रांती म्हणतात.

सहसा, वर्षातील शेवटची संक्रांती धनु संक्रांती असते आणि वर्षातील पहिली संक्रांती मकर संक्रांती असते. या वर्षीची धनु संक्रांत ही एक विशेष ज्योतिषीय घटना आहे. ज्याचा परिणाम देश, जग, हवामान आणि सर्व राशींवर व्यापक प्रभाव पडेल. ही संक्रांत काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

मेष रास

धनु संक्रांती मेष राशीच्या लोकांसाठी सौभाग्य आणि प्रगती दोन्ही घेऊन येणारी राहणार आहे. लांब पल्ल्याचा प्रवास किंवा धार्मिक कार्यक्रम फायदेशीर ठरतील. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्षणीय यश मिळू शकेल. करिअरमध्ये वाढ होईल आणि नवीन कामाच्या संधी निर्माण होतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळू शकेल.

Astro Tips: तुमचा जन्मवार कोणता? जाणून घ्या त्या वाराच्या ग्रहाचा तुमच्या जीवनावर होणारा प्रभाव

सिंह रास

धनु राशीची संक्रांत तुमच्यासाठी ऊर्जा आणि नवीन संधींचा एक अद्भुत मिलाफ घेऊन येईल. प्रलंबित करिअरच्या कामांना गती मिळेल आणि वरिष्ठांकडून पाठिंबा वाढेल. मानसिक गोंधळ कमी होईल आणि आत्मविश्वासात वाढ होईल. परराष्ट्र व्यवहारात प्रगती शक्य आहे. कुटुंबात प्रेम आणि आदर वाढेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. या काळात तुमचे नेतृत्व कौशल्य सुधारेल आणि लोक तुमच्या मार्गदर्शनाला विशेष महत्त्व देतील.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी ही संक्रांती घरगुती आनंद आणि आर्थिक वाढ आणेल. कौटुंबिक समस्या कमी होतील आणि मनःशांती वाढेल. घरगुती बाबींमध्ये प्रगती होईल आणि कोणतेही जुने वाद मिटतील. नोकरी आणि व्यवसायामध्ये स्थिरता येईल. या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल.

धनु रास

धनु राशीतील सूर्याचे संक्रमणामुळे लोकांचा आत्मविश्वास आणि तेज वाढवेल. हा काळ नवीन सुरुवात, नवीन ध्येये आणि नवीन यशांचा आहे. घाईघाईने घेतलेले निर्णय देखील तुमच्या बाजूने ठरू शकतात. नोकरीत बदल किंवा पदोन्नती होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक मदत मिळेल आणि तुमचे आरोग्यही सुधारेल. जुन्या योजना नवीन पद्धतीने सुरू केल्यास अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळण्याची शक्यता आहे.

Kalashtami 2025: डिसेंबर महिन्यातील शेवटची कालाष्टमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढवेल. लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल आणि नवीन संपर्कांमुळे फायदा होईल. तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावाल. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंब आणि मित्रांकडून मिळालेला पाठिंबा तुमचे मनोबल वाढवेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: धनु संक्रांती म्हणजे काय?

    Ans: जेव्हा सूर्य ग्रह धनु राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्या दिवसाला धनु संक्रांती म्हणतात. हा दिवस धार्मिक व ज्योतिषीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

  • Que: सूर्य धनु राशीत प्रवेश केल्याने काय बदल होतात?

    Ans: या संक्रमणामुळे आत्मविश्वास, सकारात्मकता, ज्ञान, धर्म आणि प्रगतीशी संबंधित विषयांना चालना मिळते. करिअर व शिक्षण क्षेत्रात संधी वाढतात.

  • Que: धनु संक्रांतीचा धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: या दिवसापासून दान, जप-तप व शुभ कार्यांना विशेष फलप्राप्ती होते. सूर्य उपासनेमुळे आरोग्य व आत्मबल वाढते.

Web Title: Dhanu sankranti 2025 which zodiac signs will benefit from the sun transit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Astrology : काय सांगता ! राशीत दडलंय मागच्या जन्मीचं रहस्य ? काय सांगतं ज्योतिषशास्त्र, जाणून घ्या
1

Astrology : काय सांगता ! राशीत दडलंय मागच्या जन्मीचं रहस्य ? काय सांगतं ज्योतिषशास्त्र, जाणून घ्या

Holashtak 2026: 24 फेब्रुवारीपासून ग्रहांच्या हालचालीमध्ये होणार बदल, या राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी
2

Holashtak 2026: 24 फेब्रुवारीपासून ग्रहांच्या हालचालीमध्ये होणार बदल, या राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी

Rahu-Mangal Yuti: राहू-मंगळ होणार प्रसन्न, या राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक फायदा
3

Rahu-Mangal Yuti: राहू-मंगळ होणार प्रसन्न, या राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक फायदा

Astro Tips: या राशींच्या जोड्या राहतात सर्वाधिक आनंदी, काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
4

Astro Tips: या राशींच्या जोड्या राहतात सर्वाधिक आनंदी, काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.