फोटो सौजन्य- pinterest
दिवाळी देशभरात उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाते. सनातन धर्मात हा प्रकाशाचा सण सर्वात महत्वाचा मानला जातो. असे मानले जाते की, या दिवशी भगवान श्रीराम वनवासानंतर अयोध्येत परतले आणि त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर दिव्यांनी उजळले होते. तेव्हापासून हा उत्सव दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
दिवाळीत देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते. ही पूजा केल्याने समृद्धी लाभते आणि आर्थिक अडचणींतून सुटका होते असे मानले जाते. दिवाळीला घरी कोणत्या वस्तू आणणे शुभ मानले जाते ते जाणून घ्या
यंदा कार्तिक अमावस्या सोमवार, 20 ऑक्टोबर रोजी आहे आणि या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी केली जाणार आहे. हा दिवस संपत्ती, सौभाग्य आणि समृद्धी मिळविण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो.
दिवाळीत काही वस्तू खरेदी केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो. या दिवशी झाडू, दिवा, नारळ आणि देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, म्हणून दिवाळीला नवीन झाडू आणल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते, अशी मान्यता आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, दिवाळीला घरी नारळ आणणे खूप शुभ मानले जाते. यावेळी तुमच्या तिजोरीमध्ये किंवा देव्हाऱ्याजवळ नारळ ठेवल्याने आर्थिक अडचण कमी होण्यास मदत होते आणि संपत्तीमध्ये वाढ होते. हा उपाय केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहते असे मानले जाते.
दिवाळीला प्रकाशाचा सण म्हटले जाते. कारण या दिवशी दिवे लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घरात शांती आणि आनंद नांदतो आणि देवी लक्ष्मी तिच्या आशीर्वादाने प्रसन्न होऊन आशीर्वाद देते.
यावेळी देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीची खरेदी करुन ती घरी आणणे खूप शुभ मानले जाते. त्यांची योग्यरित्या पूजा केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि कुटुंबाचे कल्याण होते.
झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी नवीन झाडू खरेदी करून घरात ठेवल्याने घर स्वच्छ होतेच शिवाय संपत्तीमध्येही वाढ होते. असे मानले जाते की, दिवाळीमध्ये झाडू खरेदी केल्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांवर कायम देवीचा आशीर्वाद राहतो. दिवाळी हा केवळ प्रकाशाचा सण नसून समृद्धी आणि शुभ सण आहे. या दिवशी योग्य प्रकारे केलेली खरेदी आणि भक्तिभावाने केलेली पूजा योग्य मानली जाते. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि आनंद येतो, अशी मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)