फोटो सौजन्य- pinterest
दिवाळी हा केवळ दिवे लावण्याचा आणि गोड पदार्थ खाण्याचा सण नसून या सणांमध्ये घरात समृद्धी, आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जा आणण्याचा हा सर्वात शुभ प्रसंग आहे. यावेळी दिवाळीमध्ये संध्याकाळच्या वेळी आपल्या राशीनुसार काही उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद, संपत्ती येते, असे म्हटले जाते. हा उपाय केल्याने कौटुंबिक आणि आर्थिक फायदाच होत नाही तर मानसिक शांती, नातेसंबंधातील सुसंवाद आणि आध्यात्मिक प्रगती देखील होते. दिवाळीमध्ये आपल्या राशीनुसार कोणते उपाय करायचे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांनी संध्याकाळी तुपाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. तसेच हनुमान चालिसाचे पठण करावे. त्यासोबतच गणपती बाप्पाला लाल रंगांची फुले अर्पण करावी. हा उपाय केल्याने तुमच्यामधील कार्यक्षमता, धैर्य आणि यश वाढते. तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि सर्व अडथळे दूर होतात.
वृषभ राशीच्या लोकांनी संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मीला खीर आणि गोड पदार्थ अर्पण करावे. असे खूप करणे खूप फायदेशीर राहील. यावेळी तुम्ही गाईंना हिरवा चारा किंवा गूळ खाऊ घाला. हा उपाय केल्याने आर्थिक स्थिती देखील सुधारते. तुमच्या कुटुंबात आणि व्यवसायात सुसंवाद आणि सहकार्य वाढेल.
मिथुन राशीच्या लोकांना दिवाळीमध्ये गरजूंना पांढरा तांदूळ किंवा दूध दान करावे. त्यानंतर 108 वेळा गायत्री मंत्रांचा जप करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये शांती येते आणि कौटुंबिक जीवनात प्रेम टिकून राहते. मानसिक ताण कमी होईल आणि तुमच्या नात्यामधील गोडवा वाढेल.
कर्क राशीच्या लोकांनी दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी चारही दिशेला दिवा लावावा. यावेळी देवीला पांढरी फुले अर्पण करुन तुळशीच्या रोपाला पाणी दिल्यास खूप फायदा होतो. या उपायामुळे तुमचे संवाद कौशल्य वाढेल आणि कौटुंबिक संबंध सुधारतील. घरामध्ये सकारात्मक उर्जेचा प्रवाह राहील आणि सर्व मतभेद दूर होतील.
सिंह राशीच्या लोकांनी या दिवशी मंदिरात मोहरीचे तेल आणि काळे तीळ दान करावे ते शुभ मानले जाते. दिवा लावा आणि “ओम ह्रीम श्रीं लक्ष्मीभ्यो नमः” चा जप करा. या विधीमुळे तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी ओळख आणि आर्थिक स्थिरतेच्या संधी वाढतील.
कन्या राशीच्या लोकांनी देवी लक्ष्मीला मूग अर्पण करणे आणि त्यांच्या घरातील देव्हाऱ्यात तुपाचा दिवा लावणे फायदेशीर ठरेल. तसेच, कुत्र्यांना खाऊ घाला किंवा गरिबांना दान करा. या उपायामुळे आत्मशुद्धी होईल आणि जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण होईल.
तूळ राशीच्या लोकांनी दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी देवी लक्ष्मीला दिवा आणि गुलाबाच्या पाकळ्या अर्पण कराव्यात. तसेच मुलांना नवीन कपडे किंवा मिठाई दान कराव्यात. यामुळे तुमच्या नात्यात संतुलन आणि सकारात्मकता येईल. तुमच्या कौटुंबिक जीवनात प्रेम आणि सुसंवाद वाढेल.
वृश्चिक राशीच्या लोकांनी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे आणि मुलांना मिठाई देणे शुभ राहील. तसेच महालक्ष्मी अष्टकमचे पठण करा. या उपायामुळे लाभ, मैत्री आणि प्रार्थना पूर्ण होतील. सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात यश वाढेल.
धनु राशीच्या लोकांनी भगवान विष्णूला पिवळी मिठाई किंवा हळद अर्पण करावी आणि मुख्य दरवाजाजवळ नऊ दिवे लावावेत. या उपायामुळे तुमचे करिअर, नेतृत्व कौशल्य आणि व्यावसायिक यश वाढेल. तुम्हाला आदर आणि कामात नवीन संधी मिळतील.
मकर राशीच्या लोकांनी संध्याकाळच्या वेळी प्रार्थनेत 108 वेळा ओम नमः शिवायचा जप करणे आणि शनिदेवाला तिळाचे तेल आणि काळे कपडे अर्पण करणे फायदेशीर आहे. या उपायामुळे नशीब आणि उच्च शिक्षणात फायदा होईल. तुमच्या आयुष्यात शिस्त आणि स्थिरता येईल.
कुंभ राशीच्या लोकांनी दिवाळीच्या सकाळी सूर्यदेवाला गुलाबाच्या पाकळ्या मिसळलेले पाणी अर्पण करावे. गरजूंना काळी डाळ किंवा ब्लँकेट दान करावे. या प्रथेमुळे आंतरिक परिवर्तन, आत्म-सुधारणा आणि मानसिक शांती मिळेल. तसेच आध्यात्मिक प्रगती आणि मनःशांती मिळेल.
या राशीच्या लोकांनी देवी लक्ष्मीला मिठाई आणि पिवळी फुले अर्पण करा. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा आणि लक्ष्मी स्तोत्राचा पाठ करा. या विधीमुळे प्रेम, संतुलन आणि आनंद वाढेल. नातेसंबंधांमध्ये सुसंवाद आणि तुमच्या घरात शांती आणि आनंद नांदेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)