
फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार रविवार हा सूर्यदेवाच्या पूजेसाठी समर्पित असा दिवस आहे. जर तुमच्या कुंडलीत सूर्यदोष असेल तर तुम्ही रविवारी उपवास करून तो दूर करु शकता. जर तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य बलवान असेल तर करिअरमध्ये प्रगती होईल. तुमच्या वडिलांशी असलेले तुमचे नाते अधिक दृढ होईल. सूर्य दोष करण्यासाठी कोणत्या मंत्रांचा जप करावा आणि कोणते उपाय करावे ते जाणून घ्या
आज रविवार, 2 नोव्हेंबर रोजी कार्तिक शुक्ल द्वादशी आहे. यावेळी सूर्य तूळ राशीत आहे आणि चंद्र कुंभ राशीत आहे. या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी 11.42 वाजता सुरु होणार आहे आणि दुपारी 12.26 वाजता तो संपेल.
अग्नि आणि स्कंद पुराणांमध्ये सांगितल्यानुसार हे व्रत केल्याने आनंद, समृद्धी, आरोग्य आणि मोक्ष मिळतो. तसेच सूर्याचा प्रभावही दूर होतो. जर तुम्हाला हे व्रत करायचे असेल तर ते कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या रविवारी करू शकता आणि 12 रविवार उपवास केल्यानंतर, उद्यापन करा.
रविवारच्या दिवशी उपवास करण्यासाठी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठल्यानंतर आंघोळ करुन देव्हारा स्वच्छ करुन घ्या. एका चौरंगावर वस्त्र ठेवा, पूजा साहित्य ठेवा त्यानंतर व्रताची कथा वाचा किंवा ऐका. तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात फुले, तांदूळ आणि रोळी घालून सूर्यदेवाला जल अर्पण करा. असे केल्याने सूर्य देवाचे आशीर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे. यावेळी सूर्य तुमच्या कुंडलीमध्ये मजबूत असतो.
रविवारी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे आणि सूर्यदेवाच्या मंत्राचा जप “ओम सूर्याय नमः” किंवा “ओम घरिणी सूर्याय नमः” हे देखील विशेष लाभ देतात.
रविवारी गूळ आणि तांब्याचे दान करण्याला विशेष महत्त्व आहे. यामुळे सूर्यदेवांचे विशेष आशीर्वाद मिळतात. तसेच जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळते.
सूर्य दोष दूर करण्यासाठी तुमच्या वडिलांची सेवा करा. जर तुमचे वडील जवळ नसतील तर तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांची सेवा करा. एक मजबूत सूर्य व्यक्तीचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढवतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)