फोटो सौजन्य- pinterest
कार्तिकी एकादशी आणि तुळशी विवाह यांचे हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान हरि चार महिन्यांच्या योगिक निद्रेमधून जागे होतात आणि संपूर्ण विश्वावरील त्यांच्या जबाबदाऱ्या पुन्हा स्वीकारतात. भगवान विष्णू जागे होताच विवाह, मुंज, गृहप्रवेश इत्यादी शुभ कार्यक्रम सुरू होतात. ज्योतिषशास्त्रामध्ये कार्तिकी एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी दिवे लावण्याला विशेष महत्त्व आहे. या पवित्र दिवशी किती दिवे लावावेत याबद्दल काही नियम सांगण्यात आलेले आहे. धार्मिक मान्यतेनुसार, 5, 7, 11, 21, 51 आणि 108 दिवे लावणे खूप शुभ मानले जाते. एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी दीपदानाचे महत्त्व आणि दीपदानाच्या वेळ काय आहे जाणून घ्या
एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 5, 7, 11 किंवा 21 दिवे लावणे खूप शुभ मानले जाते. या एकादशीला 11 हा आकडा भगवान विष्णूंचे प्रतीक मानले जाते. या दिव्यांसह पंचदेवांना 5 दिवे लावणे अर्पण करावे.
भगवान विष्णू आणि शालिग्रामजींच्या स्तंभावर चारमुखी तुपाचा दिवा लावावा.
तुळशीजवळ कमीत कमी पाच दिवे लावावेत.
तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रत्येक बाजूला एक असे दोन दिवे लावा.
स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेला समर्पित दिवा लावा.
पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा ठेवा.
तुमच्या घराजवळील मंदिरात कमीत कमी पाच दिवे लावा.
कार्तिकी एकादशी आणि तुळशी विवाह पंचदेवांसाठी म्हणजे गणपती बाप्पा, महादेव, देवी दुर्गा सूर्य नारायण आणि भगवान विष्णू पाच देवांना दिवे अर्पण करावे. हे पाच दिवे पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करणारी आहेत. पंचदेवासाठी दिवा लावल्याने कुटुंबात आनंद, शांती आणि समृद्धी येते आणि पंचदेवांचे आशीर्वाद मिळतात अशी मान्यता आहे.
काही ठिकाणी सात दिवे लावण्याची परंपरा आहे. तर या सात दिव्यांना सात दिवसांचे सात लोकांचे प्रतीक मानले जाते. जर एखादा भक्त एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी 11 हजार दिवे लावू शकला तर ते खूप पुण्यपूर्ण समजले जाते. मान्यतेनुसार इतके दिवे लावल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि शाश्वत पुण्य वाढते.
जर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावत असल्यास फक्त 11 वाती असलेला दिवा लावल्याने तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. दरम्यान भगवान विष्णूंसाठी दिवा लावत असल्यास चार तोंडी दिवा लावावा. ज्यामुळे चारही दिशांनी आनंद आणि शांती आणतो.
एकादशी आणि तुळशी विवाहाच्या दिवशी शुद्ध तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. यावेळी दिवा लावताना तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा आणि भगवान विष्णूचे स्मरण करा. तसेच गाईच्या तुपाचा लावलेला दिवा शुभ आणि पुण्यपूर्ण मानला जातो. हाच दिवा भगवान विष्णूंचे आशीर्वाद, देवी लक्ष्मीचे स्मरण आणि पूर्वजांना मनःशांती प्रदान करतो. तुळशी विवाहाच्या दिवशी गाईच्या तुपाने लावलेला दिवा सर्वोत्तम मानला जातो. जर तूप उपलब्ध नसेल तर तिळाच्या तेलाने देखील दिवा लावता येऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






