फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम
हल्ली सोशल मीडियावर पाण्यात हळद टाकण्याचा हा ट्रेंड खूप वाढलेला आहे. मात्र ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार असे व्हिडिओ बनवल्यामुळे घरात नकारात्मकता प्रवेश करु शकते. जाणून घ्या पाण्यात हळद टाकण्यामागील ट्रेंडचे काय आहे सत्य
पाण्यात हळद टाकण्याचा ट्रेंड सध्या इंन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका काचेच्या ग्लासमध्ये हळद टाकल्यास त्या पाण्याचा रंग बदलला जातो. हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेक जण रात्रीच्या अंधारात पाण्यात हळद मिसळून यावर रिल्स तयार करत आहे. पण हा ट्रेंड वादाच्या भोवऱ्यात असल्याचे दिसत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांच्या म्हणण्यानुसार, हा ट्रेंड करण्यामागे तांत्रिक क्रिया असल्याचा अंदाज त्यांनी सांगितला आहे.
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यापैकी हा एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ज्योतिषशास्त्रांनी असा दावा केला आहे की पाण्यात हळद टाकून व्हिडिओ बनवणे म्हणजे भूतांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. ज्योतिषी अरुण कुमार व्यास यांच्या म्हणण्यानुसार, या ट्रेंडमुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करु शकते. तसेच याचा तुमच्या कुंडलीवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, पाण्यात हळद टाकून रिल्स बनवणे ही एक तांत्रिक प्रक्रिया मानली जाते. असे मानले जाते की, यामुळे भूत आणि आत्मे आकर्षित होतात. तसेच ग्रह देखील कमकुवत होतात. या सर्वांचा परिणाम गुरु आणि चंद्रावर होत असल्याचे म्हटले जाते. त्यासोबतच व्यक्तीच्या मानसिक स्थिती आणि नशिबावर देखील याचा परिणाम होतो, असे म्हटले जाते.
काही ज्योतिषांच्या मते, पाण्यात हळद टाकणे हा ट्रेंड करणे चुकीचे मानले जात नाही. त्यांच्या मते, कोणतेही तांत्रिक विधी करताना मंत्रांचा जप केले जातात. मात्र हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी बनवला गेला आहे. त्यामुळे पाण्यात हळद घालणे हे चुकीचे मानले जात नाही. पाणी हे चंद्र आणि हळद हे गुरु आहे या दोन्हीमुळे गजकेसरी योग तयार होत आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा एखाद्याचे लग्न होणे शक्य नसते तेव्हा हळदीचा वापर केला जातो. चंद्र आणि गुरुशी भेटणे थोडे चुकीचे आहे. यामुळे काही काळ तुमचे मन विचलित होऊ शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)