फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार शरीराच्या प्रत्येक अवयवाचे आकार उत्कृष्ट, चांगले, सरासरी आणि वाईट अशा श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. त्यावर आधारित असलेल्या व्यक्तीचे गुण आणि स्वभाव यावरुन व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमहत्व समजते. ती स्त्री कुटुंबासाठी भाग्यवान आहे की नाही. पायांच्या आकारावरुन महिलांचा स्वभाव त्यांचे व्यक्तिमहत्त्व जाणून घेता येते.
ज्योतिषशास्त्रानुसार ज्या महिलांच्या पायांच्या नसा दिसत नाही अशा महिलांना देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते. ज्या घरामध्ये अशा महिला ज्या घरामध्ये असतात त्या घरातमध्ये कायम धन, समृद्धी, सुख, संपत्ती आणि शांती असते, असे मानले जाते. असे देखील मानले जाते की, त्या घरावर कधीही आर्थिक संकट येत नाही आणि त्यांना पैशाची कमतरता भासत नाही.
ज्या महिलांच्या पायाचा आकार सापासारखा असतो त्या महिला भाग्यवान समजल्या जातात. असे मानले जाते की, अशा महिला जन्मापासूनच नशीब आणि भाग्य सोबत घेऊन येतात. अशी लोक त्यांच्या जीवनामध्ये कायम यशस्वी होतात. अशा लोकांना नेहमीच नशिबाची साथ लाभते. त्यामुळे या लोकांचे कधीच कोणतेही काम थांबत नाही. तसेच कोणत्याही कामामध्ये अडथळे आणि अडचणी येत नाही.
ज्या महिलांच्या बोटांचा आकार समान असतो, वर खाली नसतात अशा महिला नेहमी त्यांच्या परिवारामध्ये आनंद घेऊन येतात. यामुळे परिवाराला कधीही दुःख किंवा वेदना सहन कराव्या लागत नाही.
ज्या महिलांचे पाय मऊ आणि त्यांचा रंग लालसर असतो अशा महिला कायम आनंदी राहतात. त्यांना जीवनामध्ये कधीही धन आणि समृद्धीची कमतरता भासत नाही. यामुळे त्यांच्या जोडीदारालाही फायदा होतो.
ज्या महिलांचे पाय खूप जड असतात त्या महिलांचा स्वभाव भावनिक असतो तसेच त्या धार्मिकही असतात. हे लोक खूप मेहनत करतात. असे लोक निर्णय घेण्यास खूप उशीर करतात. परंतु त्या दयाळू आणि विश्वासू असतात.
ज्या महिलांच्या पायांचा आकार लहान असतो पण त्या संतुलित दिसतात अशा महिला समाजामध्ये खूप लोकप्रिय समजल्या जातात. अशा महिलांचा स्वभाव खूप चांगला असतो. या महिला प्रभावशाली भूमिका बजावतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)