Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मठात 11 माळ जप केला म्हणजेच स्वामींची कृपा होते का? पूजा विधींबाबत श्री स्वामी समर्थांचे स्पष्ट मत

असं म्हटलं जातंं की, स्वामीचं नामस्मरण 11 माळ जप करत केल्याने त्यांची कृपादृष्टी होते. मात्र याबाबत स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांना एक शिकवण दिली होती.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 25, 2025 | 01:59 PM
मठात 11 माळ जप केला म्हणजेच स्वामींची कृपा होते का? पूजा विधींबाबत श्री स्वामी समर्थांचे स्पष्ट मत
Follow Us
Close
Follow Us:
  • मठात 11 माळ जप केला म्हणजेच स्वामींची कृपा होते का?
  • पूजा विधींबाबत श्री स्वामी समर्थांचे स्पष्ट मत
स्वामी अवतार घेऊन आज कित्येक वर्ष लोटली मात्र आजही त्यांचे विचार आचरणात आणणारे त्यांचे अनेक भक्त आहेत. स्वामींचे भक्त कायमच स्वामींनी दिलेला तारकमंत्र असो किंवा त्यांचं नामस्मरण असो हे नित्यनेमाने करतात. अनेक स्वामी भक्त दर गुरुवारी स्वामींच्या मठात जातात 11 माळ जप करतात.सर्वसाधारण असं म्हटलं जातंं की, स्वामीचं नामस्मरण 11 माळ जप करत केल्याने त्यांची कृपादृष्टी होते. मात्र याबाबत स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांना एक शिकवण दिली होती.

स्वामींना मानणारा वर्ग मोठा आहे पण त्यांचे विचार आचरणात आणणारा मात्र कमी आहे. त्यांची पूजा केली व्रत पारायणं केली म्हणजे स्वामी आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात मग जो स्वामींची भक्ती करत नाही त्याच्यावर स्वामींची कृपा होत नाही का यावर स्वत: स्वामी म्हणतात की, कर्मकांड हे फक्त एक सोपस्कार आहेत. जर एखादी व्यक्ती जी स्वामींना मानते आणि रोजच्या रोज तारकमंत्र किंवा मठात जाऊन 11 माळ जप करते आणि फक्त त्यावरच अवलंबून राहते तर स्वामी कधीच अशा भक्तांवर कृपा करत नाही. देव देव करुन देव भेटत नाही असं स्वामींनी सांगितलं. देवाची पूजा केल्याने शरीर आणि मन प्रसन्न व्हायला हवं. एखादा व्यक्ती देवाचं सगळं करतोय पण जवळच्या माणसांची वाईट वागणं किंवा अवतीभवती असलेल्या माणसांना चुकीची वागणूक देणं अशा व्यक्ती स्वामींचे कधीच भक्त नसतात स्वामी त्यांना आपले भक्त मानत देखील नाहीत.

Swami Samarth : तारकमंत्र म्हणजे काय ? स्वामी समर्थांनी तारकमंत्र का लिहिला ? 

स्वामींच्या मते खरा भक्त कोण ?

स्वामी म्हणतात की, 11 माळ जप किंवा तारक मंत्राचं पठण करुन कृपा मिळवता येत नाही तर अंत:करण शुद्ध असावं लागतं. नाही 11 माळ पण स्वामींची एक माळ असा जप असावा ज्यातं मानतील भाव शुद्ध आणि समर्पणाचा असावा. स्वामी कधीच म्हणत तुमची कामं आणि कर्तव्य सोडून माझी भक्ती करा. स्वामी हेच म्हणतात की तुमचं मन सेवाभावी असूद्यात. जो इतरांना मदत करतो जो इतरांशी माणूस म्हणून वागतो, ज्याला अनेक आव्हान पेलताना देखील देवावर असलेली श्रद्धा कायम ठेवता येते असा व्यक्ती स्वामींचा भक्त असतो.

अनेक जण असे आहेत जे कधीच स्वामींचं नामस्मरण करत नाही किंवा त्यांना स्वामी समर्थांबद्दल माहित देखील नाही पण तरीही स्वामी त्यांच्या पाठीशी कायम असतात कारण अशा माणसांचं कर्म चांगलं असतं त्यांच्या सत्कर्मामुळे स्वामी महाराज कायम पाठीशी असतात. देवाला धुप कापूर दाखवून काही होत नाही. देव श्रद्धा आणि विश्वासाचा भूकेलेला असतो. त्यामुळे स्वामी हेच सांगतात की मन शांत ठेवण्यासाठी किंवा कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तारकमंत्र आणि नामस्मरण आहेच पण हे तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल.

स्वामींच्या विचारांनी चालणारे जाणकार यश कदम त्यांच्या मुलाखतीत असं सांगतात की तुम्ही स्वामींच्या 11 माळ जप नका करु पण एक माळ अशी करा की त्यातील एक मणी अक्कलकोटच्या औंदबर झाडाला ऐकू जाईल, मणी चोळप्पा महाराजांच्या समाधीला ऐकू जाईल. इतकं सामर्थ्य तुमच्या भक्तीत असायला हवं. तेव्हा लक्षात येईल की स्वामी महाराज तुमच्या अंतरात्म्यात आहेत.

Shree Swami Samarth : आयुष्यात येणारी खरी खोटी माणसं कशी ओळखवीत? जाणून घ्या श्री स्वामी समर्थांचा मोलाचा सल्ला

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मठात 11 माळ जप केल्याने स्वामी समर्थांची कृपा होते का?

    Ans: स्वामी समर्थांच्या मते केवळ 11 माळ जप केल्यानेच कृपा मिळते असे नाही. जप हा एक साधन आहे; पण कृपा मिळण्यासाठी अंतःकरण शुद्ध, भाव प्रामाणिक आणि आचरण योग्य असणे महत्त्वाचे आहे.

  • Que: स्वामी समर्थ कर्मकांडाबद्दल काय सांगतात?

    Ans: स्वामी म्हणतात की कर्मकांड हे केवळ सोपस्कार आहेत. फक्त पूजा, व्रत, पारायण करून जर माणूस चुकीचे वागतो, इतरांना त्रास देतो, तर अशा व्यक्तीवर स्वामी प्रसन्न होत नाहीत.

  • Que: रोज तारकमंत्र किंवा 11 माळ जप करणारा भक्त खरा भक्त ठरतो का?

    Ans: नाही. जो भक्त फक्त जपावर अवलंबून राहतो आणि आपल्या वागणुकीत बदल करत नाही, तो खरा भक्त ठरत नाही. स्वामी म्हणतात – “देव देव करून देव भेटत नाही.”

Web Title: Does chanting 11 malas in the monastery mean receiving the grace of the swami shri swami samarths clear opinion on the rituals of worship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 01:59 PM

Topics:  

  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

श्री स्वामी समर्थांची होते ‘या’ राशींवर कृपा, करिअरमध्ये प्रगतीसह मिळतो आशीर्वाद; जीवनात सुखसमृद्धीची उधळण
1

श्री स्वामी समर्थांची होते ‘या’ राशींवर कृपा, करिअरमध्ये प्रगतीसह मिळतो आशीर्वाद; जीवनात सुखसमृद्धीची उधळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.