फोटो सौजन्य- pinterest
गुरुवारी काही गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, गरुवारी दान केल्याने देवगुरु बृहस्पतीसह भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. त्याचप्रमाणे गुरुवारचा दिवस भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांना समर्पित आहे. मान्येनुसार, गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा केल्याने बृहस्पतिचे देखील आशीर्वाद मिळतात. ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार, 9 ग्रहांपैकी गुरु ग्रह हा शुभ ग्रह मानला जातो. गुरु ग्रह हा ज्ञान, धर्म, धोरण, सुख, समृद्धी, भाग्य, अध्यात्म आणि मोक्ष यांचा कारक मानला जातो. त्यांच्या कृपेमुळे व्यक्तीला नशिबाची साथ लाभेल असे म्हटले जाते. यावेळी काही वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. कोणत्या आहेत त्या वस्तू जाणून घ्या
गुरुवारी केळीचे दान करणे शुभ मानले जाते. सत्यनारायणाच्या पूजेमध्ये देखील केळीच्या पानांचा वापर केला जातो. केळी दान करणे आणि केळीच्या पानांचा वापर करणे या दोन्ही गोष्टी सौभाग्याशी संबंधित असल्याचे म्हटले जाते.
गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगांच्या गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते. पिवळ्या गोष्टींचे दान केल्याने तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. या दिवशी पिवळ्या रंगांचे धान्य दान करणे शुभ मानले जाते.
जर एखाद्या व्यक्तीला व्यवसायात सतत तोटा होत असल्यास त्या व्यक्तीने गुरुवारी सुपारीचे एक पान घ्या. त्या पानांवर हळदीचे दोन तुकडे ठेवा. त्यानंतर भगवान विष्णू यांच्या मंदिरात जाऊन ते अर्पण करा. हा उपाय केल्याने तुम्हाला फायदा होईलच त्यासोबतच व्यवसायात आणि जीवनात येणाऱ्या सर्व समस्या सुटतील.
जर तुम्हाला एखाद्या समस्येचा किंवा कामामध्ये कोणतेही अडथळे येत असल्यास गुरुवारी भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन घडा दान करावे. घडाचे दान केल्याने तुमच्या जीवनात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. बृहस्पति देवाच्या कृपेने तुमच्यावरील सर्व संकटे दूर होऊन तुम्हाला नशिबाची साथ लाभेल.
गुरुवारी तांदूळामध्ये केशर टाकून त्याचे गरजू व्यक्तींना दान करुन त्यासोबत त्यांना थोडी दक्षिणा देखील द्यावी. हा उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांचा तुमच्यावर आशीर्वाद राहतो अशी मान्यता आहे. या उपायामुळे तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)