
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मात कालष्टमी तिथीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान शिवाचे भयंकर रूप असलेल्या भगवान कालभैरवाला समर्पित आहे. कालाष्टमीला भैरव अष्टमी असेही म्हणतात. पौष महिन्यात येणारी कालाष्टमी नेमकी कधी आहे याबाबत अनेक भाविकांच्या मनामध्ये संभ्रम आहे.
श्रद्धेनुसार, कालष्टमीचे व्रत आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व भीती आणि दुःख दूर होतात. भगवान कालभैरवाच्या आशीर्वादाने जीवन नेहमीच आनंद, शांती आणि समृद्धीने भरलेले असते. पौष महिन्यातील कालाष्टमी तिथी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
पंचांगानुसार, पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीची सुरुवात शनिवार, 10 जानेवारी रोजी सकाळी 8.24 वाजता सुरू होणार आहे ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, 11 जानेवारी रोजी सकाळी 11.21 वाजता संपणार आहे. अशा वेळी नवीन वर्षातील पहिली कालष्टमीचे व्रत शनिवार, 10 जानेवारी रोजी पाळले जाणार आहे.
कालष्टमीच्या दिवशी सकाळी सर्वांत प्रथम आवरुन झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर, तुमच्या देव्हाऱ्यात दिवा लावा किंवा कालभैरव मंदिरात जा. भगवान कालभैरवाला धूप, दिवे, फुले आणि फळे अर्पण करा. भगवान कालभैरवाचे ध्यान करा. ओम कालभैरवाय नम: या मंत्राचा जप करा. या दिवशी उपवास करा. घरी कालभैरवाची मूर्ती किंवा चित्र ठेवू नका. फक्त मंदिरातच त्याची पूजा करा. या दिवशी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.
भगवान कालभैरव हे भगवान शिवाचे भयंकर रूप आणि काळ, न्याय आणि संरक्षणाचे अधिपती मानले जातात. असे मानले जाते की कालष्टमीच्या दिवशी त्यांची पूजा केल्याने नकारात्मक शक्तींच्या भीतीपासून मुक्तता मिळते. याव्यतिरिक्त, शत्रूंमुळे येणारे अडथळे कमी होतात आणि कालसर्प दोष, शनि आणि राहू यांच्या दुष्परिणामांपासूनही आराम मिळतो.
कालाष्टमीच्या दिवशी खोटे बोलणे आणि वादविवाद टाळावे.
मद्यपान आणि मांसाहार करणे टाळावे.
कोणाचाही अपमान करु नका
आळस आणि नकारात्मक विचार
धार्मिक श्रद्धेनुसार कुत्रा हे कालभैरवाचे वाहन असल्याचे मानले जाते. त्यामुळे कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याला अन्न खाऊ घातल्यास कालभैरव प्रसन्न होतात. अपघात, भय आणि शत्रू बाधा कमी होते, अशी मान्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: कालाष्टमी ही भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरव यांना समर्पित तिथी आहे. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते.
Ans: कुत्रा हे कालभैरवाचे वाहन मानले जाते. त्यामुळे कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याला अन्न दिल्यास कालभैरव प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे.
Ans: काळे तीळ, उडीद डाळ, लोखंडी वस्तू, काळे कपडे किंवा अन्न दान करणे शुभ मानले जाते.