फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येकाला स्वप्नात कोणत्या ना कोणत्या गोष्टी दिसतात. जर एखाद्याला स्वप्नात साप दिसत असल्यास त्याचे शुभ अशुभ परिणाम जाणवतात. मात्र, स्वप्नात कोणत्या रंगांचा साप दिसतो यावरुन समजले जाते की ही स्वप्ने शुभ आहे की अशुभ. स्वप्नशास्त्रानुसार तुम्हाला स्वप्नामध्ये वारंवार नाग किंवा साप दिसत असल्याचा अर्थ तुमच्या कुंडलीमध्ये सर्पदोष असल्याचा होतो. त्याचबरोबर पांढरा रंगाचा साप चावताना दिसल्यास ते शुभ मानले जाते. स्वप्नात कोणत्या रंगांचा साप दिसणे शुभ अशुभ आहे, जाणून घ्या
स्वप्नशास्त्रानुसार, तुम्हाला स्वप्नात हाताला किंवा पायाला साप चावताना दिसणे म्हणजे तुम्हाला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागणार आहे, असा अर्थ होतो. त्यासोबतच तुमच्या करिअर आणि नातेसंबंधामध्ये सुद्धा तणाव असण्याची शक्यता असते. याचा अर्थ तु्म्हाला सतर्कता बाळगावी लागणार आहे.
तुम्हाला स्वप्नात साप चावणे म्हणजे हे एक शुभ संकेत आहे. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, तुमचे जुने वैर संपुष्टात येऊ शकते. असे म्हटले जाते की, यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे.
तुम्हाला स्वप्नात वारंवार काळा साप चावण्याचा अर्थ तुमच्या कुंडलीमध्ये राहू आणि केतू दोष निर्माण होत आहे. या दोन्ही दोषांमुळे कालसर्प दोष तयार होतो. या स्वप्नाचा अर्थ असा देखील होतो की, तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच वैवाहिक जीवनात देखील समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
जर तुम्हाला स्वप्नामध्ये पिवळा किंवा पांढरा साप चावताना दिसणे हे शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला अनेक फायदे होणार आहेत आणि तुमची प्रलंबित सर्व कामे पूर्ण होणार आहे. तुम्हाला धार्मिक गोष्टींमध्ये आवड निर्माण होईल. स्वप्नात पांढरा साप दिसण्याचा अर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत, असा होतो.
स्वप्नामध्ये तुम्हाला साप चावण्याचा प्रयत्न करत आहे मात्र त्याने दंश केला नाही याचा अर्थ तुमची एखाद्या मोठ्या समस्येतून सुटका होणार आहे. तसेच तुम्ही जीवनामध्ये कोणत्याही समस्येवर मात करण्यात यशस्वी व्हाल. असे स्वप्न करिअरच्या यशासंदर्भात देखील दिसू शकतात.
स्वप्नात साप चावणे हे अशुभ लक्षण मानले जाते. चाप चावण्याचा अर्थ तुम्हाला एखाद्या गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो किंवा कोणीतरी तुम्हाला इजा करण्याच्या प्रयत्नात असू शकतात. सापाला नकारात्मकतेचे प्रतीक मानले जात असल्याने तुमच्या जीवनातील नकारात्मकता वाढण्याची शक्यता जास्त असते. यामुळे तुम्हाला जीवनामध्ये कायम भीती, चिंता, राग इत्यादी गोष्टी टाळणे गरजेचे आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)