फोटो सौजन्य- istock
आज बुधवार, 18 जूनचा दिवस सर्व मूलांकांच्या लोकांसाठी खास राहील. मंगळाचा प्रभाव सर्व मूलांकांच्या लोकांवर दिसून येतो. अंकशास्त्रानुसार, मूलांक 5 असलेल्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तर काहीजण बाहेर जाण्याचे नियोजन करु शकतात. त्याचसोबतच मूलांक 9 असलेल्या लोकांना काही आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या
मूलांक 1 असलेले लोक कामाच्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाची भूमिका बजावू शकता. या लोकांचा आज आत्मविश्वास वाढलेला राहील. या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. तुम्ही सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहाल.
मूलांक 2 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपुर्वक घ्या. कोणतेही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी घरच्यांचा पाठिंबा मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
मूलांक 3 असलेल्या लोक कामाच्या ठिकाणी नवीन योजना आखू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.
मूलांक 4 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या लोकांनी कोणत्याही कामाचे नियोजन करताना विचारपूर्वक करावे. कोणताही निर्णय घेतलास तुम्हाला त्यात फायदा होईल.
मूलांक 5 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. मार्केटिंग, मीडिया किंवा कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित असलेल्यांसाठी आजचा काळ खूप खास आहे. तुम्ही सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. सौंदर्य, फॅशन किंवा सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ राहणार आहे. तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभाग होऊ शकतात.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा दिवस चांगला राहील. या लोक एखाद्या विषयावर खोलवर विचार करतील. कामाच्या ठिकाणी संयम आणि समजूतदारपणाने काम करणे फायदेशीर ठरेल. तुम्ही घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता.
मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. या मूलांकांच्या लोकांना कठोर मेहनत घेतल्यास त्याचे तुम्हाला फायदा मिळेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होतील.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या तुम्हाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागेल. तुम्हाला एखाद्या कामाचे सकारात्मक परिणाम मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)