फोटो सौजन्य- pinterest
अनेकांना झोपेमध्ये विविध प्रकारची स्वप्ने पडतात. तर काहींना विचित्र स्वप्न पडतात जी स्वप्न समजण्यासारखी नसतात. प्रत्येक व्यक्तीला विविध स्वप्न पडत असले तरी काहींना स्वप्नामध्ये हनुमान दिसण्याचा नेमका अर्थ काय हे माहीत नसते. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये हनुमान दिसणे हे खूप शुभ असल्याचे मानले जाते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले गेले असल्यास ते शुभ मानले जात नाही तर गंभीर लक्षण मानले जाते. स्वप्नात हनुमानजींचे दर्शन होण्याचा नेमका अर्थ काय, जाणून घ्या
स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला सामान्य स्वरुपात हनुमानाचे दर्शन स्वप्नात झाल्यास ते शुभ असल्याचे मानले जाते. स्वप्नामध्ये हनुमानाची मूर्ती किंवा मंदिर पाहणे हे लक्षण शुभ मानले जाते. स्वप्नात हनुमानाची मूर्ती किंवा मंदिर दिसण्याचा अर्थ तुमच्यावर येणारे संकट दूर होऊ शकते किंवा तुमचे आधीच रक्षण करत असल्याचे सुद्धा लक्षण मानले जाते. तसेच तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.
स्वप्नामध्ये तुम्हाला हनुमानजी उडताना दिसणे देखील खूप शुभ मानले जाते. हे स्वप्न आध्यात्मिकरित्या शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीची उन्नती, यश आणि अडथळ्यांवर मात करण्याचे देखील संकेत देतात. या स्वप्नामुळे असे दिसून येते की, तुमच्यातली लपलेली शक्ती ओळखल्याने तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्ही यश मिळवू शकता.
जर तु्म्ही स्वप्नामध्ये स्वतःला रोज मंदिरात जाताना पाहणे किंवा हनुमानाची सेवा करताना पाहणे हे शुभ संकेत मानले जाते. जर तुम्हाला याचा अर्थ असा होतो की, तुमचे अध्यात्मिक मार्गावर आहे. तसेच तुम्ही साधनेसाठी हनुमानजींना आमंत्रित करीत आहात. त्याचप्रमाणे तुम्हाला स्वप्नामध्ये पंचमुखी हनुमान दिसल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
स्वप्नामध्ये तुम्हाला गदा, सिंदूर, चमेलीची फुले इत्यादी गोष्टी दिसत असल्यास ते शुभ मानले जाते. स्वप्नामध्ये या गोष्टी दिसल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या आणि नकारात्मकता दूर होते, अशी मान्यता आहे. असे म्हटले जाते की, तुम्ही हनुमानजींचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलात आणि तेथील प्रसाद खाल्ल्यास तुमची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होऊ शकतात.
जर तुम्हाला स्वप्नामध्ये शांत माकड दिसले किंवा माकडांचा समूह दिसण्याचा अर्थ ते शुभ मानले जाते. असे मानले जाते की, तुम्ही एखाद्या निर्णयामुळे त्रासलेले असाल किंवा कुठेतरी भटकत असल्यास हनुमानजी तुम्हाला योग्य दिशा दाखवतील असा त्याचा अर्थ होतो. तसेच तुम्ही स्वप्नामध्ये हनुमान चालिसा वाचताना किंवा ऐकताना पाहण्याचा अर्थ म्हणजे तुमच्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील. त्याचप्रमाणे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)