फोटो सौजन्य- pinterest
सामुद्रिक शास्त्र हे एक प्राचीन शास्त्र असल्याचे म्हटले जाते. जे एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरील रचना, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव दर्शवते, तर पायंवरील रेषा एखाद्या व्यक्तीच्या अवयवांची वैशिष्ट्ये पाहून त्यांच्या जीवनातील भविष्य, स्वरुप तसेच जीवनाची दिशा दर्शवते. शरीराच्या प्रत्येक भागाचे स्वतःचे असे विशेष महत्त्व आहे. या रेषांमुळे कपाळाचा आकार, डोळे, नाक, कान आणि अगदी पायाची बोटे यांचा आकार समजला जातो. पायांच्या बोटावर किंवा अंगठ्यावर केस वाढणे हे विशेष लक्षण मानले जाते. पायांच्या बोटावर केस असणे शुभ की अशुभ जाणून घ्या
सामान्यतः पायांच्या बोटांवर केस नसतात किंवा असल्यास ते खूप हलके असतात. परंतु काही लोकांच्या पायाच्या बोटांवर जाड आणि स्पष्ट केस असतात. ही सामान्य गोष्ट मानली जात नाही. सामुद्रिकशास्त्रामध्ये या गोष्टींना विशेष महत्त्व दिले गेले आहे. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि भविष्य प्रतिबिंबित केले जाते.
पायाच्या बोटांवर केस असणे म्हणजे संपत्ती, समृद्धी आणि आरामाचे लक्षण असल्याचे मानले जाते. अशा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मजबूत असतात त्याचबरोबर स्वतःच्या बळावर आयुष्यात खूप उंची गाठतात. त्यामुळे ती व्यक्ती निश्चितच मेहनती असते असे मानले जाते पण त्या जोडीला त्यांना नशिबाचीही साथ मिळते. हे लोक व्यवसाय, नोकरी किंवा कोणत्याही विशिष्ट क्षेत्रात अनेकदा मोठ्या पदापर्यंतचे यश संपादन करतात.
ज्या लोकांच्या पायांवरील बोटांवर केस असतात ते खूप स्वावलंबी, जबाबदार आणि आत्मविश्वासू असल्याचे मानले जाते. हे लोक त्यांच्या शब्दांवर ठाम राहतात आणि निर्णय घेण्यास अजिबात संकोच करत नाहीत. त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता देखील जास्त असते.
समुद्रीशास्त्रात या लोकांना ज्योतिष, तंत्र, ध्यान, योग आणि अध्यात्म यासारख्या विषयांमध्ये खोलवर रस असल्याचे दिसून येते तसेच त्यांना बाह्य जगाच्या ग्लॅमरपेक्षा आत्म-ज्ञानात जास्त रस असतो. ही सर्व वैशिष्ट्ये त्या व्यक्तीमधील खोलवर विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता दर्शवते.
दरम्यान, बहुतेक वेळा पायांवरील केस ही शुभ मानले जाते, परंतु काही ग्रंथांमध्ये असे म्हटले गेले आहे की जर बोटांवर केस खूप जास्त आणि जाड असतील तर ते व्यक्तीमध्ये लपलेला राग आणि अहंकार देखील दर्शवू शकतात. असे लोक कधीकधी रागाच्या भरात असंतुलित निर्णय घेतात. या लोकांनी कायम सावधगिरी आणि संयम बाळगण्याचा सल्ला दिला जातो.
सामुद्रिकशास्त्रानुसार पायांच्या बोटांवर केस असणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते. ही लोक आपल्या नशिबावर अवलंबून राहत नाही. या लोकांना मेहनत करायला आवडते. तसेच ते जिथे जातील तिथे ते तेथील लोकांवर आपला प्रभाव पाडतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)