Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dream Science: स्वप्नात गंगा आणि इमारत यासह या गोष्टी दिसणे मानले जाते शुभ

रात्री झोपेत आपल्याला अनेक स्वप्न पडतात. प्रत्येक स्वप्नांचा विविध असा अर्थ असतो. स्वप्नात काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. स्वप्नात गंगा आणि इमारतसह कोणत्या गोष्टी पाहणे शुभ आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 25, 2026 | 01:02 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • स्वप्नात गंगा आणि इमारत दिसणे
  • या गोष्टी दिसणे असते शुभ
  • स्वप्नात कोणत्या गोष्टी पाहणे असते शुभ
 

 

झोपेत आपल्याला दिसणाऱ्या स्वप्नांना स्वप्नशास्त्रात विशेष महत्त्व आहे. स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नाचा संबंध वास्तविक जीवनाशी संबंधित असतो. कधीकधी आपल्याला स्वप्नांमध्ये अशा गोष्टी दिसतात ज्या आपल्याला घाबरवतात किंवा ज्या साकार होणे अशक्य असते. या स्वप्नांचा अर्थ स्वप्नशास्त्रात देखील स्पष्ट केला आहे. स्वप्नात गंगा नदी किंवा बांधकाम सुरू असलेली इमारत यासारख्या काही गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. या गोष्टी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणतात. स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसणे शुभ आहे ते जाणून घ्या

स्वप्नात अंत्ययात्रा दिसणे

रात्री झोपेमध्ये कधीकधी आपल्याला अनपेक्षित स्वप्न पडतात. अशा स्वप्नांमुळे आपल्याला लगेच जाग येते. स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात अंत्ययात्रा पाहणे हे एक शुभ संकेत असू शकते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, तुम्हाला काही काळापासून आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असल्यास तर आता तुम्हाला त्यातून आराम मिळू शकतो. हे स्वप्न आरोग्यात सुधारणा आणि जीवनात सकारात्मकतेचे लक्षण असू शकते.

Holi 2026: पालखी आणि होळीचा काय आहे संबंध, जाणून घ्या कोकणातील पालखी परंपरा

स्वप्नात इमारत पाहणे

जर तुम्हाला स्वप्नात एखादी इमारत किंवा घर बांधले जात असल्याचे दिसत असेल तर ते शुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की, व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होणार आहेत. स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात इमारत पाहणे हे प्रगतीचे लक्षण मानले जाते. या स्वप्नांचा असा अर्थ होतो की, तुम्ही हाती घेतलेले कोणतेही महत्त्वाचे काम शुभ परिणाम देऊ शकते. तसेच तुम्हाला आर्थिक फायदा देखील होऊ शकतो.

नापास होण्याचे स्वप्न

बऱ्याचदा, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षेत नापास होण्याचे स्वप्न पडते. हे स्वप्न आपल्याला अनेकदा घाबरवते. स्वप्नशास्त्रानुसार, पेपरमध्ये नापास होण्याचे स्वप्न पाहणे चांगले मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला काही शुभ परिणाम मिळू शकतात किंवा तुम्ही जे काम करणार आहात त्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात.

स्वप्नात नाग दिसणे

स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात काळा साप दिसणे हे देखील एक शुभ संकेत असल्याचे मानले जाते. याचा अर्थ तुमचा सामाजिक दर्जा वाढू शकतो. शिवाय, तुम्हाला काही क्षेत्रात नफा मिळवण्याच्या संधी मिळू शकतात. परंतु योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार, जीवनाचे परिणाम तुमच्या कृतींवर अवलंबून असतात.

zodiac sign: रवि योगामुळे कर्क आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

स्वप्नात गंगा दिसणे

असे मानले जाते की जर तुम्हाला स्वप्नात गंगा दिसणे किंवा तुम्ही स्वतःला त्यात स्नान करताना पाहणे हे खूप शुभ लक्षण मानले जाते. स्वप्नशास्त्रानुसार या स्वप्नांचा अर्थ असा होतो की, व्यक्तीच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी टिकून राहू शकते. याव्यतिरिक्त, तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. हिंदू धर्मात गंगा नदीला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच स्वप्नात गंगा पाहणे अत्यंत शुभ मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वप्नात गंगा नदी दिसणे शुभ का मानले जाते?

    Ans: स्वप्नशास्त्रानुसार गंगा नदी दिसणे हे पवित्रता, पापक्षालन आणि मानसिक शांतीचे प्रतीक आहे. असे स्वप्न आयुष्यात सकारात्मक बदल, अडचणींवर मात आणि आध्यात्मिक प्रगती दर्शवते.

  • Que: स्वप्नात मोठी किंवा उंच इमारत दिसल्यास काय अर्थ असतो?

    Ans: उंच इमारत यश, प्रगती आणि सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक मानली जाते. करिअरमध्ये उंची गाठण्याची किंवा मोठी संधी मिळण्याची शक्यता दर्शवते.

  • Que: अशी शुभ स्वप्ने पडल्यावर काय करावे?

    Ans: स्वप्नशास्त्रानुसार देवाचे आभार मानावेत, सकारात्मक विचार ठेवावेत आणि चांगल्या संधींचा लाभ घ्यावा.

Web Title: Dream science seeing these things including the ganges and a building in a dream is auspicious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Palmistry: मधल्या बोटावर ‘ही’ ४ चिन्हे असल्यास व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे आणि प्रतिभेचे रहस्य
1

Palmistry: मधल्या बोटावर ‘ही’ ४ चिन्हे असल्यास व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे आणि प्रतिभेचे रहस्य

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या
3

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या

Vinayak Chaturthi: श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Vinayak Chaturthi: श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.